आता 'या' महामार्गावर मिळणार चहा-कॉफी मोफत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Dec-2018
Total Views |


 


लखनऊ : आग्रा-लखनऊ द्रुतगती महामार्गावर आता चहा-कॉफी मोफत मिळणार आहे. गाडी चालकांची झोप उडवी म्ह्णून हा अनोखा निर्णय इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट अॅथोरिटीने घेतला आहे. हा निर्णय किती फलदायी ठरतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. गाडी चालकांना चहा-कॉफी देण्यासाठी या महामार्गावर ३० किलोमीटरच्या प्रत्येक अंतरावर चहा-कॉफीचा स्टॉल लावण्यात येणार आहे.

 

"द्रुतगती महामार्गावर रात्री १० ते सकाळी ६ च्या दरम्यान मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे या काळात आग्रा-लखनऊ द्रुतगती महामार्गावर मोफत चहा व कॉफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे." अशी माहिती टोल प्लाझाचे सहायक मॅनेजर अमित चंदेल यांनी दिली. जानेवारी २०१८ पासून या महामार्गावर शंभरहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. यावेळी ३०० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. रात्रीच्यावेळी गाडी चालकांच्या डोळ्यावर झोप असल्याने अपघात होत आहेत. रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत गाडी चालकांना चहा-कॉफी मोफत देण्यात येणार आहे.

 

"चार चाकी वाहनातील गाडी चालक आणि अन्य एका प्रवाशाला चहा-कॉफी मोफत देण्यात येणार आहे. गाडीतील अन्य प्रवाशाला चहा-कॉफी हवी असल्यास त्यासाठी मात्र पैसे मोजावे लागतील." असे चंदेल यांनी सांगितले. द्रुतगती महामार्गावर उभ्या असलेल्या आणि दुर्घटनाग्रस्त वाहनांमुळे सुद्धा अपघातात वाढ झाल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@