नोटीशीवर मुख्यमंत्री कार्यालयाचा खुलासा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Dec-2018
Total Views |


मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ च्या निवडणुकीत सादर केलेल्या शपथपत्रात दोन गुन्हेगारी स्वरूपाची प्रकरणे लपवल्याचा सर्वोच्च न्यायालयात याचिकाकर्त्यांने आरोप केला. यावर मुख्यमंत्री कार्यालयाने खुलासा प्रसिद्ध केला असून सर्व माहीती स्पष्ट केल्याचे म्हटले आहे.

 

मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, २०१४ च्या विधानसभा निवडणुकी दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेले प्रतिज्ञापत्र त्यांच्यावर दाखल सर्व प्रकरणांची माहिती स्पष्टपणे देण्यात आली. या संदर्भात याच याचिकाकर्त्यांनी यापूर्वी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि ती उच्च न्यायालयाने तथ्यहीन मानून फेटाळली होती. याच याचिकाकर्त्याविरुद्ध उच्च न्यायालयाने न्यायालय अवमानाची कारवाईसुद्धा केली होती. शिवाय सतत खोडसाळ याचिका दाखल करीत असल्याबद्दल कारवाई का करू नये? असेही विचारले होते, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आले आहे.

 

दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी २०१४ च्या निवडणुकीसाठी सादर केलेल्या शपथपत्रात त्यांच्यावर असलेले दोन गुन्हे लपवले, असा दावा करत सतीश उके यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यानंतर न्यायालयाने फडणवीस यांना नोटीस बजावली आहे. ही दोन्ही प्रकरणे नागपूरची आहेत. आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेली नोटीस ही याचिका दाखल करून घ्यायची की नाही यासंदर्भातील आहे. तेथे त्यावर योग्य ते उत्तर सादर केले जाईल, असेही यावेळी मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@