भारताला इस्लामिक राष्ट्र बनवू नका : मेघालयचे न्यायाधीश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Dec-2018
Total Views |



 
 
 
मेघालय : “कोणीही भारताला इस्लामिक राष्ट्र बनविण्याचा प्रयत्न करू नये.” असे मत मेघालयचे न्यायाधीश सुदीप रंजन सेन यांनी व्यक्त केले आहे. “स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करायला पाहिजे होते. परंतु त्यावेळी भारताने धर्मनिरपेक्ष भूमिका घेतली.” असे न्या. सुदीप रंजन सेन यांनी म्हटले. तसेच आसाममध्ये राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) प्रक्रियेत त्रुटी असल्याचेही त्यांनी सांगितले.
 

अधिवास दाखल्याच्या संदर्भात अमोन राणा या तरुणाने न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर निकाल देताना न्या. सुदीप रंजन सेन यांनी भारताविषयीचे आपले मत मांडले. एनआरसी प्रक्रियेत त्रुटी असल्याने अनेक परदेशी नागरिक भारतीय झाले आणि जे मूळ भारतीय नागरिक आहेत त्यांनाच यादीत स्थान मिळाले नाही. ही अंत्यत दुर्दैवी बाब आहे. असे न्या. सेन यांनी सांगितले.

 

बांग्लादेश, अफगाणिस्तान, पाकिस्तान या देशातील हिंदू, शीख, जैन आणि पारसी या समाजाच्या लोकांचा ते मुस्लिम नसल्यामुळे त्या देशांमध्ये छळ केला जातो. अशा लोकांना भारतात राहण्याची परवानगी देण्यात यावी. तसेच कोणत्याही कागदपत्रांशिवाय त्यांना भारताचे नागरिकत्व देण्यात यावे. त्यासाठी देशातील खासदारांनी कायदा करावा. असे न्या.सेन यांनी या याचिकेवरील निकालामध्ये म्हटले.

 

भारत पाकिस्तान फाळणीनंतर पाकिस्तानने इस्लामिक राष्ट्र म्हणून स्वत:ला घोषित केले. परंतु भारताने मात्र हिंदू राष्ट्र म्हणून स्वत:ला घोषित करण्याऐवजी धर्मनिरपेक्ष भूमिका घेतली. अस न्या. सुदीप रंजन सेन यांनी म्हटले. या निकालाची प्रत पंतप्रधान, कायदा मंत्री, गृहमंत्री, मेघालय राज्याचे राज्यपाल, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री यांना पाठवावी. असे निर्देश न्या. सेन यांनी सरकारी वकिलांना दिले आहेत.

 

कोणीही भारताला इस्लामिक राष्ट्र बनविण्याचा प्रयत्न करून नये. नाहीतर येणारा काळ हा भारत आणि संपूर्ण जगासाठी चांगला ठरणार नाही. देशाचे पंतप्रधान मोदींनाही या गोष्टीची पूर्ण जाणीव आहे. असे न्या. सुदीप रंजन सेन यांनी निकालात म्हटले आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@