बच्चन यांच्या ‘प्रतीक्षा’ बंगल्याची दिवार पाडणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Dec-2018
Total Views |



मुंबई : राज्यभरात रस्तारुंदीकरणाचे काम जोरात चालू आहे. याचा फटका आता सामान्यांसोबत कलाकारांनाही बसत आहे. बॉलिवूडचा शहंशाह अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील ‘प्रतीक्षा’ बंगल्याची भिंत पाडण्यात येणार आहे. यामध्ये बंगल्याचा लॉनचा काही भाग आणि बंगल्याशेजारील प्रॉपर्टीचा काही भाग रास्ता रुंदीकरणाच्या कामामध्ये जाणार आहे.

 

वाढदिवसादिवशी आपल्या चाहत्यांना ज्या जागेतून अभिवादन करतात त्या लॉनचा भाग पाडणार आहेत. जुहूमधील ४५ फूट रुंद असलेल्या संत ज्ञानेश्वर मार्गाचे ६० फूट रुंदीकरण होणार आहे. मात्र हे काम प्रातिक्षा शेजारील बंगल्याच्या मालकांनी रुंदीकरणासाठी दिलेल्या नकारामुळे गेल्या ६ महिन्यांपासून रखडले होते. दरम्यान दोन्ही बंगल्यांची कंपाउंड वॉलही १५ फूट मागे घेण्याची सूचना महापालिकेने दिली होती.

 

काय आहे अमिताभ बच्चन यांची संपत्ती?

 

> मुंबईमध्ये महानायकाच्या ५ बंगले आहेत.

> प्रतीक्षा, जलसा, जनक, आशियानासह एक बंगला.

> ज्यांची किंमत ३०० कोटींच्या वर आहे.

> जलसा बंगल्यात सध्या त्यांचे वास्तव्य आहे.

> जनक बंगल्यामध्ये अमिताभ बच्चन यांचे कार्यालय आहे.

> त्यांनी नात आराध्यासाठी ‘आशियाना’ बंगल्याची खरेदी केली होती.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@