रोहित,अश्विन पर्थ कसोटीतून बाहेर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Dec-2018
Total Views |


 


नवी दिल्ली : भारतने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला कसोटी सामना धडाक्यात जिंकला. दुसरा कसोटी सामना पर्थ येथील 'ऑप्टस' स्टेडियमच्या मैदानावर होणार आहे. यासाठी बीसीसीआयने संघ जाहीर केला असून दुखतपतग्रस्त रोहित शर्मा आणि आर.अश्विनला विश्रांती देण्यात आली आहे. पृथ्वी शॉनंतर भारतीय संघाला दुखापतीने ग्रहण लागल्याचे दिसत आहे.

 

शुक्रवारपासून सुरु होणाऱ्या पर्थमधल्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघ जाहीर केला. रोहित शर्माला कंबरदुखीचा तर अश्विनला पोटाचा त्रास होऊ लागल्याने या दोघांनाही दुसऱ्या कसोटीत विश्रांती देण्यात आली आहे. त्याबदल्यात रवींद्र जडेजा, भुवनेश्वर आणि उमेश यादव यांना संधी देण्यात आली आहे. पृथ्वी शॉही अजून दुखापतीतून सावरला नसून त्यालाही याही कसोटीमधून वगळण्यात आले आहे. अॅडलेड कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाला ३१ धावांनी पराभूत करत मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.

 
 
 

‘ऑप्टस'वर खेळवला जाणार पहिलाच कसोटी सामना

 

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान पर्थमध्ये होणाऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या अंतिम १३ खेळाडुंची यादी जाहीर करण्यात आलीय. बीसीसीआयने गुरुवारी सकाळी ट्विटरवर १३ खेळाडुंच्या नावाची घोषणा केली. शुक्रवारी सुरु होणार हा सामना पर्थच्या ऑप्टस स्टेडियममध्ये होणार आहे. या मैदानात अजून एकही कसोटी सामना खेळवला गेला नाही.

 

भारतीय संघ : -

 

विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा, जसप्रीत बुमराह भवनेश्वर कुमार, उमेश यादव

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@