‘हैदर’ मधील हा अभिनेता बनला दहशतवादी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Dec-2018
Total Views |

 


 
 
 
श्रीनगर : ९ डिसेंबर रोजी श्रीनगर येथील मुजगुंड येथे दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. या दोन दहशतवाद्यांसोबत जवानांची तब्बल १८ तास चकमक सुरु होती. या दोन दहशतवाद्यांपैकी एक तरुण हा ‘हैदर’ या सिनेमातील अभिनेता असल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली आहे.
 

साकीब बिलाल असे या दहशतवाद्याचे नाव असून तो तेथील स्थानिक तरुण होता. साकीब हा अकरावी इयत्तेत विज्ञान शाखेत शिकत होता. साकीब बरोबर ठार झालेला दुसरा दहशतवादी हा साकीबच्याच शाळेत इयत्ता नववीमध्ये शिकत होता. हाजी बंडीपोरा या शाळेत हे दोघेजण शिकत होते. ३१ ऑगस्टपासून साकीब आणि त्याचा मित्र दोघेही घर सोडून पळून गेले होते. त्यानंतर त्यांच्या मृत्यूची बातमी मिळाल्याने दोघांच्याही कुटुंबियांना धक्का बसला आहे.

 

साकीबने दहशतवादी बनण्याचा मार्ग का निवडला असावा? हा प्रश्न त्याच्या घरच्यांना पडला आहे. साकीबचे कुटुंबिय गेल्या काही महिन्यांपासून ठिकठिकाणी त्याचा शोध घेत होते. परंतु आम्हाला तो सापडला नाही. आता त्याच्या मृत्यूविषयीची ही बातमी समोर आल्याने त्यांना जबरदस्त धक्का बसला आहे. असे साकीबचे मामा असिम अजीज यांनी सांगितले. साकीबला इंजिनिअर व्हायचे होते. एकेदिवशी सामान आणण्यासाठी साकीब घराबाहेर पडला तो तेव्हापासून परतलाच नाही. त्यानंतर साकीब आणि त्याच्या मित्राला एका व्यक्तीसोबत बाईकवर बसून जाताना काही स्थानिक लोकांनी पाहिले होते. अशी माहिती असिम यांनी दिली.

 

साकीबचे कुटुंब हे पूर्णत: शेतीवर अवलंबून आहे. साकीबसोबत ठार झालेला त्याचा मित्रदेखील गरिब कुटुंबातील होता. साकीबला फुटबॉल, तायक्वांडो आणि कबड्डी या खेळांची आवड होती. खेळाबरोबरच साकीब अभिनयही करायचा. असे त्याच्या घरच्यांनी सांगितले. दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांच्या ‘हैदर’ या सिनेमात साकीबने एक भूमिका साकारली होती. तेव्हा तो इयत्ता सहावीमध्ये शिकत होता. ‘हैदर’ सिनेमात दोन दृश्ये साकीबवर चित्रित करण्यात आली होती. त्यापैकी एका दृश्यामध्ये साकीबने बॉम्ब हल्ल्यातून वाचलेल्या मुलाची भूमिका साकारली होती. बालपणापासून साकीब स्थानिक स्तरावरील अनेक लहानसहान नाटकांमध्ये छोट्या भूमिका साकारत असे. अशी माहिती साकीबचे मामा असिम यांनी दिली. ‘हैदर’ या सिनेमात काम करण्याआधी साकीबने वेथ ची येही या नाटकात प्रमुख भूमिका साकरली होती. टागोर हॉल येथे झालेल्या या नाटकाच्या शोनंतर त्या भूमिकेसाठी साकीबला सर्वोत्कृष्ट कलाकाराचे बक्षीस मिळाले होते. या नाटकाच्या एका शोसाठी साकीब ओडिशाला जाऊन आला होता. साकीब आणि त्याचा मित्र दोघेही घर सोडून गेल्यानंतर त्यांनी लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेसाठी काम करण्यास सुरुवात केली. अशी माहिती पोलीसांनी दिली.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@