मुलींच्या क्रिकेट सामन्यात डी-रॉक्स विजयी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Dec-2018
Total Views |

सूतगिरणी संचालिका रंजना नेवे यांनी केले उद्घाटन

 
 
 
चोपडा : 
 
येथील कला, शास्त्र आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणावर सुरू असलेल्या सी.एम. चषक क्रीडा स्पर्धात मुलींच्या क्रिकेट सामन्यात ए.एस.सी.कॉलेजच्या डी. रॉक्स संघाने नऊ गडी राखून ए.एस.सी.कॉलेज बी संघाचा सपाटून पराभव केला.
 
 
क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन तापी सहकारी सूतगिरणीच्या संचालिका व भाजप शहर उपाध्यक्षा रंजना श्रीकांत नेवे यांनी चेंडू टोलवून केले. नाशिक विभाग ओबीसी सेलचे अध्यक्ष प्रदीप पाटील, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा ललिता सोनगिरे, भाजयुमो तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, तालुका क्रीडा संघटना अध्यक्ष राजेंद्र आल्हाट, प्रा.अतुल पाटील, डॉ.राहुल पाटील, डॉ. आशिष पाटील, भुपेंद्र पोळ, साहेबराव पाटील, कृउबा संचालक धनंजय पाटील, सुनील सोनगिरे आदी उपस्थित होते.
 
 
या क्रिकेट स्पर्धांमध्ये चार संघांनी सहभाग घेतला होता. पाच षटकांच्या झालेल्या सामन्यात मुलीही क्रिकेटमध्ये मागे नसल्याचे सहभागी स्पर्धकांनी दाखवून दिले. पंच म्हणून नरेंद्र महाजन व अरविंद जाधव यांनी काम पाहिले.
@@AUTHORINFO_V1@@