तळोदा बसस्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे सहा महिन्यापासुन बंद छेडखानीच्या प्रकार वाढले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Dec-2018
Total Views |

जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची गरज.

 


तळोदा (प्रतिनिधी) :- तळोदा शहरातील बसस्थानक वरील सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या सह्या महिन्यांपासुन बंद अवस्थेत आहेत. एसटी महामंडळातील राज्यातील सर्व आगारांसह बसस्थानकांतही प्रवासी तसेच कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
 
 
बसस्थानक परिसरात चोऱ्या-माऱ्या, छेडछाड आदी अनेक गोष्टी घडत असल्यास असे प्रकार रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मदत होत होती परंतु गेल्या सहा महिन्यांपासुन सीसीटीव्ही यंत्रनाच बंद बसल्याने चोरी, महिलांची छेडछाड हे प्रकार पुन्हा होऊ लागले आहेत.
 
 
या कॅमेऱ्यांवर देखरेख ठेवण्याचे काम एसटीच्या सुरक्षा विभागावर आहे. महिलांची सुरक्षा, कर्मचाऱ्यांच्या कामावर देखरेख, तसेच संशयास्पद व्यक्ती आणि सामानावर लक्ष ठेवण्यासाठी बसस्थानकावर सध्या सुरक्षा यंत्रणाच कार्यरत नाही. तसेच रात्री 9 नंतर बसस्थानकात कोणतेच कर्मचारी उपस्थित राहत नाही.
 
 
दिनांक 10 डिसेंबर रोजी सायंकाळी 5:30 वाजेच्या सुमारास बसस्थानक परिसरात 17 वर्षीय मुलीची छेड करुन तिचा विनयभंग करण्याचा प्रकार झाला असुन दोन मुलांविरुध्द तळोदा पोलीस स्टेशन ला भादंवी कलम 354 (अ) (ड), 509, 34 व लैंगिक अपराधापासुन बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 8, 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कल्पेश गुलाबराव पाटील व अविनाश धनराज पाटील रा. आश्रावा ता. कुकरमुंडा येथील दोघांना अटक करण्यात आली आहे.
 
 
तसेच सुत्रांच्या माहितीनुसार मोबाईल चोरीचे प्रकार सुध्दा झाले आहेत परंतु याबाबत पोलीस स्टेशन ला तक्रार नाही. तळोदा हे तालुक्याचे शहर असुन, तळोद्यात शिक्षण घेण्यासाठी दररोज शेकडो विद्यार्थी व विद्याथीनी शहरात येत असतात, यामुळे बसस्थानक, मेन रोड, कॉलेज रोड, कॉलेज चौफुली, न्यु हायस्कुल परिसरात विद्यार्थी-विद्यार्थींनीचे वर्दळ असते. यामुळे गर्दीचा फायदा घेत टवाळखोरांकडुन विद्यार्थिंनी व महिलांची छेड काढण्याचे प्रकार वाढले आहेत.
 
 
जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कंत्राट पध्दतीने सदर सीसीटीव्ही यंत्रना बसविण्यात आली होती, कंत्राट संपल्याने कंत्राटदार दुरूस्ती करण्यास येत नाही. यावर जिल्हाधिकारी यांनी स्वत: लक्ष घालुन सीसीटीव्ही यंत्रना दुरुस्त करण्याची मागणी तालुक्यातील नागरिक, विद्यार्थिनी व महिला करित आहेत.
@@AUTHORINFO_V1@@