बी. पी. सिंह एफटीआयआयचे नवे अध्यक्ष

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Dec-2018
Total Views |
 
 

नवी दिल्ली : राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था (एफटीआयआय) अध्यक्षपदी 'सीआयडी' या टीव्ही मालिकेचे दिग्दर्शक-निर्माते ब्रिजेंद्र पाल सिंह यांची नियुक्ती झाली. माहिती आणि दूरसंचार मंत्रालयाकड़ून त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. अभिनेते अनुपम खेर यांच्या राजीनाम्यानंतर महिनाभरापासून हे पद रिक्त होते.

ब्रिजेंद्र पाल सिंह हे सीआयडी या प्रसिद्ध मालिकेचे दिग्दर्शक-निर्माते आहेत. त्यांनी १९७०-७३ या कालावधीत एफटीआयआयमध्येच सिनेमॅटोग्राफीचे शिक्षण घेतले आहे. 'लिम्का बुक'मध्ये सीआयडी मालिकेसाठी एक दृष्य सलग १११ मिनिटे चित्रित करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. 'एफटीआयआय'ने सिंह यांचे अभिनंदन केले आहे. 'एफटीआयआय'च्या अध्यक्षपदी आणि प्रशासकीय मंडळाच्या संचालकपदी नियुक्ती झाल्याबद्दल सिंह यांचे अभिनंदन!' असे एफटीआयआयने केलेल्या ट्विटमध्ये ट्विटमध्ये म्हटले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@