सरासरीचे ट्रेडिंग इंडिकेटर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Dec-2018
Total Views |



मागील लेखापर्यंत आपण विविध चार्ट्सबद्दल माहिती घेतली. मला कल्पना आहे आणि मान्यही आहे की, गेले दोन-तीन लेख हे थोडे किचकट आणि कंटाळवाणे वाटले असतीलही. पण, ही माहिती घेतल्याशिवाय पुढे जाणे अशक्य होते हेही तितकेच खरे. यापुढील प्रवास तुलनेने सोपा आहे. कारण, यापुढील माहिती लक्षात राहायला सोपी आणि रंजक असेल. आजपासून आपण वेगवेगळ्या ‘ट्रेडिंग इंडिकेटर्स’बद्दल माहिती घेऊया. एका विशिष्ट कालावधीत, किमतीत सतत दिसणारी अस्थिरता आपल्याला चार्ट वाचायला आणि किंमत वर्तविण्यास बाधा आणते आणि ट्रेंड ओळखणे कठीण होते. येथे आपल्याला उपयोगी पडतो आपला पहिला Trading Indicator - Moving Average (सरासरी). Moving Average मागील किमतीची सरासरी घेत असल्यामुळे, ट्रेंड ओळखणे खूप सोपे जाते. धडकी भरवणाऱ्या किमतीमधील अस्थिरता आणि अनिश्चिता टाळून स्मूथ ट्रेडिंग करण्यासाठी आणि किमतीचा अचूक अंदाज वर्तविण्यासाठी Moving Average खूप उपयोगी आणि खूप लोकप्रिय इंडिकेटर आहे. यात सिम्पल आणि एक्सोपोन्शनल असे दोन प्रकार आहेत.

 

) Simple Moving Average: या प्रकारात ठरवलेल्या फक्त क्लोजिंग प्राईसचा विचार केला जातो. साऱ्या कालावधींची क्लोजिंग प्राईसची बेरीज करून, एकूण कालावधींच्या संख्येने त्याला भागले जाते . उदा : १० सिम्पल Moving Average म्हणजे महिना १० दिवसांच्या क्लोजिंग प्राईसची बेरीज भागिले १०. सोबतच्या आकृतीमध्ये आपण एक ५० दिवस आणि २०० दिवस सिम्पल Moving Average सह एक stock बघत आहोत. आपल्याला सहज लक्षात येईल की, ५० दिवसांचा चार्ट हा २०० दिवसांच्या चार्टपेक्षा किमतीमध्ये होणाऱ्या बदलांना जास्त प्रतिसाद देतो. याचा अर्थ थोडक्यात काढायचा झाला तर , सिम्पल Moving Average कालावधी घटवला तर जास्त प्रतिसाद मिळत असल्यामुळे, अल्प कालावधीमध्ये, नफा कमवण्यासाठी तर कमी कालावधी हा स्मूथ ट्रेडिंगसाठी उपयोगी पडतो. या Moving Average प्रकारात मर्यादित डेटा उपयोगात येत असल्यामुळे, त्याचे मिळणारे परिणाम जास्त परिणामकारक नसतात. म्हणून शक्यतो मोठ्या कालावधीसाठी ट्रेड करताना याचा वापर टाळावा. (क्रमश:)

 

- विजय घांग्रेकर

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@