सागर पार्कवर रंगणाररोटरी प्रीमियर लीगचे सामने

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Dec-2018
Total Views |
जळगाव : 
 
येथील रोटरी क्लब जळगाव वेस्टतर्फे सागर पार्क मैदानावर गुरुवार, 13 ते 16 डिसेंबरपर्यंत दिवस-रात्र पद्धतीने रोटरी प्रीमियर लीग (आरपीएल) सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
 
त्यात जिल्ह्यातील विविध रोटरी क्लबचे 16 संघ व 224 खेळाडूंचा समावेश आहे. 13 रोजी सायंकाळी 7 वाजता स्पर्धेचा उद्घाटन सोहळा होणार आहे.
 
या सामन्यांच्या माध्यमातून रोटरी वेस्टच्या सामाजिक उपक्रमांसाठी मदत निधी उभारण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी भंगाळे गोल्ड व ह्युंडाई यांचे सहकार्य लाभत आहे.
 
यशस्वितेसाठी अध्यक्ष संगीता पाटील, मानद सचिव, राजेश परदेशी, स्पर्धा प्रमुख अ‍ॅड. सचिन मराठे, सहप्रमुख विश्वेश स्वर्णकार आणि अ‍ॅड. सुरज जहागीर, ललित मणियार, निलेश अग्रवाल, योगेश राका, अ‍ॅड. राहुल लाठी, महेश सोनी, राहुल पवार, कपिल शहा, अतुल कोगटा आदिंसह रोटरी वेस्टचे सर्व सदस्य परिश्रम घेत आहे.
@@AUTHORINFO_V1@@