मराठा आरक्षण : वकील साळवे मांडणार बाजू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Dec-2018
Total Views |
 
 

मुंबई : मराठा आरक्षणासाठी आता उच्च न्यायालयात ज्येष्ठ विधिज्ञ हरिष साळवे हे सरकारची बाजू मांडणार आहेत. यासंदर्भात मुंबईत बुधवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, मुख्य सचिव डी. के. जैन, महाधिवक्ता कुंभकोणी यांनी ॲड. साळवे यांच्याशी चर्चा केली.

 

दरम्यान, मराठा आरक्षण विधेयकाला विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये मंजुरी मिळाली आहे. राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर राज्यात मराठा आरक्षण लागू झाले. यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, मुख्य सचिव जैन, महाधिवक्ता कुंभकोणी यांनी अॅड. साळवे यांच्याशी एका बैठकीत चर्चा केली. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतल्यानंतर त्याला आव्हान देणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

 

आरक्षणाविरोधात न्यायालयात दाखल रिट याचिकांवर प्रदीर्घ चर्चा झाली. न्यायालयात बाजू मांडण्याची विनंती सरकारने साळवेंना केल्यानंतर आता साळवे हे सरकारच्या वतीने मराठा आरक्षणाची बाजू न्यायालयात मांडणार आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@