कासोद्यात सी.एम. चषकांंतर्गत रांगोळी स्पर्धा उत्साहात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Dec-2018
Total Views |

 
 
कासोदा : 
 
सी.एम. चषक कला व क्रीडा महोत्सवअंतर्गत कासोदा येथे रांगोळी स्पर्धा करण्यात आली होती. गावातील बहुसंख्य महिला, युवती व मुलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. या स्पर्धेचा निकाल नुकताच महादेव मंदिर परिसरात जाहीर करण्यात आला.
 
 
रांगोळी स्पर्धेत तिन्ही क्रमांकाची बक्षिसे ही सहा जणांना देण्यात आली. यावेळी खा. ए. टी. पाटील, पारोळा नगरपालिकेचे नगराध्यक्ष करण पवार, सभापती अंजली पवार, पारोळा न.पा.चे नगरसेवक बापू महाजन, कार्यक्रमाचे अध्यक्ष आनंदा सुतार, भाजपचे माजी शहराध्यक्ष डॉ. जे. जे. समदाणी, कासोदा अल्पसंख्याक शहर अध्यक्ष मुजफ्फर अली, प्रकाश महाजन, नगरसेविका वर्षा पाटील, माजी ग्रा. पं. सदस्य भास्कर चौधरी, एकनाथ ठाकरे, आरिफ पेंटर, छोटू क्षीरसागर, भाजपा यु.मो. तालुकाध्यक्ष नरेश ठाकरे, प्रमोद पाटील चिलानेकर, निसार भाई, नुरुद्दीन मुल्लाजी, भारतीय पत्रकार महासंघाचे शहराध्यक्ष केदारनाथ सोमाणी, बबिताताई पाटील, रंजना राजेंद्र वाणी, पवन चौधरी, वाल्मीक ठाकरे, दीपक शिंपी, पदाधिकारी, भाजपा कार्यकर्ते, करणदादा मित्र मंडळ, त्यांच्या पूर्ण टीमने चांगल्या प्रकारे नियोजन करून स्पर्धा यशस्वी केली.
 
यावेळी करण पवार म्हणाले की, नगरपालिका झाल्याशिवाय कासोद्याचा विकास होणार नाही. तालुक्यातील सर्वात मोठे गाव असल्याने या गावात न.पा. आल्याशिवाय गावाचा विकास होणार नाही.
 
तसेच हातात झाडू असलेला फोटो काढल्याने स्वच्छता होत नाही. आ. दत्तक गावाचा पाणी प्रश्नसुद्धा सुटत नाही. पारोळा न. पा.अंतर्गत स्वच्छता असूनही माझा हातात झाडू घेऊन फोटो नाही.
@@AUTHORINFO_V1@@