बर्थडेनिमित्त युवराज सिंगने दिले ‘हे’ रिटर्न गिफ्ट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Dec-2018
Total Views |

 

 
 
मुंबई : वाढदिवसानिमित्त क्रिकेटपटू युवराज सिंग याने कॅन्सरग्रस्त मुलांसाठी एक पाऊल पुढे उचलत त्यांना अनोखी भेट देऊ केली आहे. गरीब कुटुंबातील २५ कॅन्सरग्रस्त मुलांच्या कॅन्सरवरील उपचाराचा खर्च युवराज सिंग उचलणार आहे. अशी माहिती देणारा एक व्हिडिओ युवराज सिंगने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केला आहे.
 

‘यूवीकॅन’ या संस्थेमार्फत युवराज हे मदतकार्य करणार आहे. यावर्षी युवराजचा ३७ वा वाढदिवस! काही वर्षांपूर्वी क्रिकेटपटू युवराज सिंग याला कॅन्सरने ग्रासले होते. त्या संघर्षाच्या काळात युवीचे चाहते त्याच्या सलामतीसाठी देवाकडे प्रार्थना करत होते. अखेर प्रार्थनांना यश आले आणि युवराजने कॅन्सरसारख्या महाकाय रोगावर मात करून एका नव्या जीवनास सुरुवात केली. कॅन्सरशी लढण्याचे बळ दिल्याबद्दल युवराज देवाचे आभार मानतो. परंतु आज आपल्या देशात असे अनेक लोक आहेत, ज्यांना कॅन्सरवरील उपचारांचा खर्च परवडत नाही.

 
 
 

युवराजने त्याच्या ‘यूवीकॅन’ या संस्थेमार्फत आर्थिक पोकळी भरून काढण्याचे कार्य हाती घेतले आहे. गरिब कुटंबातील २५ कॅन्सरग्रस्त मुलांच्या कॅन्सरवरील उपचारांचा खर्च उचलून युवराजने जणू त्यांना आपल्या वाढदिवसाचे रिटर्न गिफ्टच दिले आहे. तसेच यांसारख्या कॅन्सरग्रस्त इतर अनेक मुलांना मदत आर्थिक करण्याचे आवाहन युवराजने या व्हिडिओतून केले आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@