श्री अष्टांग योग संस्थेच्या सभासदांकडून नेत्रदानाचा संकल्प

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Dec-2018
Total Views |

 
जळगाव : 
 
श्री अष्टांग योग बहुउद्देशीय संस्थेच्या 9व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. यात श्रीधरनगरात प्राणायाम योग शिबिरात 40 साधकांनी सहभाग घेतला. शिबिराला प्रा. अविनाश कुमावत यांनी मार्गदर्शन केले.
 
राजू शर्मा यांनी भजन म्हटले. दुपारी संस्थेतर्फे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच 11 सभासदांनी मांगिलाल नेत्रपेढीत जाऊन नेत्रदानाचे अर्ज भरून दिले.
 
यात प्रा. अविनाश कुमावत, राजू शर्मा, डॉ. गोपाल पाटील, संजय निकम, प्रभाकर कुमावत, मंगला शर्मा, मंजू कुमावत, नाना पाटील, आर. ओ. पाटील, जितेंद्र महाजन, चंद्रकांत सुरडकर यांनी नेत्रदानाचा संकल्प केला. या वेळी शैलेश वाघ उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@