वाहतूक पोलिसांची गोलाणी मार्केटमध्ये कारवाई

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Dec-2018
Total Views |

नो-पार्किंग : 50 दुचाकीस्वारांकडून दंड वसूल


 
 
जळगाव : 
 
शहरातील मध्यवर्ती असलेल्या गोलाणी मार्केटच्या आवारात नो-पार्किंगमध्ये लावण्यात आलेल्या सुमारे 50 वाहनांवर सोमवारी वाहतूक पोलिसांनी कारवाई करीत दंड वसूल केला.
 
सकाळपासून वाहतूक पोलीस परिसरात कारवाई करत असल्याने वाहतूक कोंडी न होता रस्त्यांनी मोकळा श्वास घेतलेला दिसून आला.
 
गोलाणी मार्केटमध्ये शहरातील आणि परिसरातील अनेक जण नियमित येत असतात. दुचाकीची पार्किंग व्यवस्था अपूर्ण असल्याने जागा दिसेल येथे वाहने उभी केली जातात.
 
यामुळे अनेक वेळा वाहतुकीवर अडथळे निर्माण होत असतात. अशा तक्रारी वारंवार होत असल्याचे वाहतूक पोलिसांनी ही कारवाई केली.
 
सोमवारी सकाळी अनेक दुचाकींना वाहन जामर लावण्यात आले होते. त्यामुळे दुचाकीस्वारांमध्ये गोंधळउडाला होता. दरम्यान, पोलीस आणि वाहनधारकांमध्ये वाद निर्माण झाला.
 
सायंकाळी पुन्हा पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. त्यातील अनेक गाड्या वाहतूक शाखेत जमा करण्यात आल्या आहेत.
वाहतूक शाखेचे सहायक पोलीस उपनिरीक्षक मुनसफ पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली.
 
 
शहरात विविध ठिकाणी वाहतूक नियमांचे उल्लघन करणार्‍यांवर नियमित कारवाई होईल, असे त्यांनी सांगितले.
 
पर्यायी व्यवस्था व्हावी :  मागणी
 
 
मोबाईल खरेदी, मोबाईल रिपेअरिंगसाठी तसेच अन्य कामानिमित्त नागरिक गोलाणीमध्ये येतात. गोलाणीमध्ये बहुसंख्य मोबाईलची दुकाने आहेत.
 
येथील व्यावसायिक आणि कर्मचारी सकाळीच आपली वाहने पार्किंगमध्ये लावतात. पार्किंगची जागा कमी असल्यामुळे नागरिकांना आपली वाहने लावण्यासाठी जागा नसते.
 
त्यामुळे ते रस्त्यावरही वाहने लावत असतात. दरम्यान, मनपा प्रशासनाने पार्किंगची पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.
@@AUTHORINFO_V1@@