ज्यांना ‘भारत माता की जय’ म्हणायला त्रास होतो त्यांनी देश सोडून जावे - सोलंकी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Dec-2018
Total Views |

सावदा  : 
 
‘ज्यांना भारत माता की जय म्हणायला त्रास होतो, त्यांनी देश सोडून जावे, असा इशारा देत देशातील बाबरी मानसिकता नष्ट करण्याची गरज असल्याचे परखड प्रतिपादन बजरंग दलाचे राष्ट्रीय संयोजक व प्रमुख वक्ते सोहनजी सोलंकी यांनी सावदा येथील हुंकार सभेत केले.
 
मंचावर त्यांच्यासह महामंडलेश्वर जनार्दनस्वामी, शास्त्री भक्तीप्रकाशस्वामी, स्वरुपानंदजी महाराज, श्यामचैतन्य महाराज, विहिंप विभाग प्रमुख कैलास गायकवाड, ललित चौधरी, विहिंप भुसावळ जिल्हा प्रमुख श्रीकांत लाहोटी, जिल्हा मंत्री योगेश भंगाळे आदी उपस्थित होते.
 
प्रास्ताविक योगेश भंगाळे यांनी करताना या हुंकार सभेला 250 पेक्षा अधिक गावातील हजारो युवक व नागरिक उपस्थित आहेत, असे स्पष्ट करीत सभेच्या आयोजनाची भूमिका सांगितली.
 
स्वरुपानंद महाराज म्हणाले की, आपल्या भावनांचा अनादर होत असेल तर आपणांस आराध्य दैवत स्मरून काम करावे लागेल. तरुणांना राम मंदिर बांधायचे आहे, त्यासाठी प्रयत्न आणि नामस्मरण आवश्यक आहे.
 
शास्त्री भक्तीप्रकाश स्वामी यांनी आपण राम मंदिरासाठी कमी पडत आहोत, अध्यादेश आणला पाहिजे. न्यायाधीशच्या हस्ते निर्णय होत नसेल तर मोदीजी तुम्ही अध्यादेश आणा. 2019 अखेर राम मंदिर पूर्ण झाले पाहिजे. सरदार पटेल यांनी अध्यादेश काढीत सोमनाथ मंदिर बनविले, मग आता का नाही, असा सवाल त्यांनी केला.
 
महामंडलेश्वर जनार्दन स्वामी म्हणाले की, गल्ली ते दिल्ली हिंदूंच्या विषयांना बगल दिली जाते. न्यायालयाने दररोज सुनावणी केली असती तर या सभेची गरज पडली नसती. प्रत्येकाला जागे होण्याची गरज आहे. अयोध्येच्या मंदिराची मागणी करत आहे.
 
 
निवडणुकीचा विचार करून हुंकार सभेचे आयोजन नाही.आपले गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव पवित्रपणे साजरे करा, टिळकांनी मांडलेल्या संकल्पनांची अंमलबजावणी आवश्यक आहे, असा विचारही त्यांनी मांडला.
 
 
सोहनजी सोलंकी म्हणाले की, हुंकार सभा का हे वारंवार लोक विचारतात, बाबरी ढाचा पडून 26 वर्षे झाली. दुसरी पिढी आली. 1944 ला संतांनी राम मंदिरचा संकल्प केला होता. तरुण राम मंदिर बांधण्यासाठी तयार आहे.पटेल यांचा मोठा पुतळा बनविला अभिनंदन. पण त्यांनी केलेले काम करून दाखविण्यासाठीची गरज आहे.
 
गुलामगिरीची प्रतिके हटविले. दुर्दैवाने पटेल लवकर गेले. नेहरू म्हणाले देशातील एक इंच जागेवर भगवा फडकू देणार नाही. हिंदू आतंकवाद म्हणतात जर हिंदू आतंकवाद आला तर असे म्हणणारे दिसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
 
हा देश बाबर, अकबर यांचा नसून छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप यांचा आहे. बाजीरावचा इतिहास अमेरिकेत शिकवला जातो, पण देशात गायब केला. संभाजी राजांचे बलिदान आम्ही विसरू शकत नाही, राणी पद्मावतीच्या जोहरला विसरणार नाही, गुरुगोविंद सिंग, बंदासिंग बहादूरला नाही विसरु शकत.
 
 
पण आम्हाला हल्लेखोर, क्रूर हत्याकांड घडविणारे ‘महान’ असल्याचे सांगितले जाते. आम्ही कधी संपलो नाही आणि संपणार नाही. आज कोणात ताकद नाही जे बाबरी पुन्हा बनवू असे म्हणतील.
 
 
30 हजार मंदिर देशात तोडले. यांना भारताचे इस्लामीकरण करायचे होते. जगात देशावर प्रेम केले जाते पण आम्ही पूजा करतो. ‘भारत माता की जय’ म्हणायला गौरव वाटतो. ज्यांनाही आपत्ती आहे त्यांनी भारतातून निघून जावे.
 
 
काही लोक भारत तेरे टुकडे होंगे अशा घोषणा देतात. तुकडे पाकिस्तानचे होतील, बलुचिस्तान वेगळा होईल. पाकिस्तानमध्ये गरबा खेळणार. अफजल हम शर्मिंदा हे असे म्हणतात आणि घरघर अफजल पैदा होगा म्हणतात तर त्याला जावळीत मारणारे शिवाजी पण जन्माला येतील, हे विसरू नये.
 
 
विश्व कल्याणाची कामना आमच्या देशातील मंदिरात होते. आजही आम्ही मुंग्यांनासुद्धा उपाशी मरु देत नाही. आपण महान संस्कृतीचे आहोत. सापाला दूध पाजणे, आमच्या पूर्वजांनी शिकविले पण सापाला ठेचणेसुद्धा शिकवले.
 
 
आतंकवादीसाठी रडतात हे मानवाधिकारवाले... अखलाख मेला तर हे लोग छाती पिटतात. देशात 5 कोटी बांगलादेशचे घुसखोर रोहिंग्यांसाठी देशात खटले लढविले जातात. जगात 58 देश इस्लामी आहेत..., मग त्यांच्यात सामावून घ्या. भारत म्हणजे धर्मशाळा नाही.
 
 
अध्यादेश काढा, जोपर्यंत राम मंदिर बनणार नाही तोपर्यंत अछे दिन नाही. प्रत्येक खासदारांना निवेदन दिले आहे. ज्यांनी राम जन्माला आलाच नव्हता, असे वक्तव्य केले ते आता जानवे घालून रामाची पूजा करीत आहे.
 
 
पूर्वजांचा इतिहास आठवा आणि मनोबल जागृत करा. व्यसनांपासून दूर राहून शारिरिक बल वाढवा. शांती राहण्यासाठी शस्रबल हवे, ज्ञान आणि संघटन वाढवा.
 
सूत्रसंचालन विहिंपचे जिल्हासहमंत्री शिक्षक उबाळे यांनी आणि बिर्‍हाडे यांनी आभार व्यक्त केले.
@@AUTHORINFO_V1@@