शेअर बाजारात तेजीचे वारे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Dec-2018
Total Views |
 
 

मुंबई : निवडणूकांच्या निकालांमुळे गडगडलेला शेअर बाजार बुधवारी सावरला. बुधवारी सेन्सेक्स ६२९.०६ अंशांनी वधारुन ३५ हजार ७७९.०७ च्या स्तरावर बंद झाला तर निफ्टी १८८.४५ अंशांनी वधारत १० हजार ७३७.६० वर बंद झाला. ऑटो, बॅंकींग, मेटल आदी शेअरमध्ये खरेदी झाल्याने बाजारात तेजी दिसून आली.

 

शेअर बाजारातील गुंतवणूक संस्था सीएलएसएने मोदींचा करीश्मा कायम राहणार असल्याचा भरवसा दिल्याने बाजारात तेजी परतली. निफ्टीमध्ये हिरो मॉटोक्रॉप .२३ टक्क्यांची सर्वाधिक वाढ झाली. गेल्या ११ आठवड्यातील ही सर्वाधिक वाढ आहे. दिवसअखेर तो ३२४८ रुपयांवर बंद झाला. इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्समध्ये सहा टक्क्यांनी वाढ झाली. भारती एअरटेल .२७ टक्क्यांनी वधारला. गेल्या काही दिवसांपासून गडगडलेला येस बॅंकेच्या शेअरमध्येही पाच टक्क्यांनी वाढ झाली. बॅंकेचे नवे अध्यक्ष नियुक्त होण्याचा मार्ग येत्या वार्षिक बैठकीत मोकळा होणार असल्याने शेअर १८६.५० रुपयांवर बंद झाला.

 

रिझर्व्ह बॅंकेचे नवनियुक्त गव्हर्नर शक्तिकांत दास यांची नियुक्ती बॅंकींग आणि बिगर बॅंकींग क्षेत्राला लाभदायक ठरणार या आशेने दोन्ही क्षेत्रातील शेअरमध्ये खरेदी दिसून आली. येस बॅंक, कोटक बॅंक, एसबीआय, पीएनबी आदी बॅंकांचे शेअर वधारले. एनबीएफसी कंपन्या डीएचएफएल, इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्ससारखे शेअर वधारले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@