अदानी इलेक्ट्रिसिटी विरोधात मुंबईत मोर्चा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Dec-2018
Total Views |



 
 
 
मुंबई : मुंबई उपनगरात राहणारे वीजग्राहक गेल्या काही काळापासून ‘अदानी इलेक्ट्रिसिटी’ च्या वाढीव वीज बिलामुळे त्रस्त आहेत. आज साकीनाका येथील रस्त्यावर नागरिकांनी अदानी कंपनीचा निषेधार्थ मोर्चा काढला होता. साकीनाका येथील वीज केंद्रावर हा मोर्चा नेण्यात आला. साकीनाका विभागातील नागरिक मोठ्या संख्येने या मोर्च्यामध्ये सहभागी झाले होते. मोर्चादरम्यान अदानी इलेक्ट्रिसिटीच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. साकीनाक्याच्या जरीमरी येथून अदानी कंपनीच्या कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता. राष्ट्रीय एकता फाऊंडेशनचे अध्यक्ष अब्बास मिर्जा यांच्याकडून हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता.
 

या मोर्च्यात माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांचाही सहभाग होता. अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीची शासनाने याप्रकरणी चौकशी सुरु केली आहे. अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीद्वारे ग्राहकांची लुटमार सुरु आहे. असा आरोप वीजग्राहकांनी केला. अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीने याप्रकरणी आपले सर्व व्यवहार पारदर्शक करावेत. कंपनीला आलेला एकूण खर्च आणि झालेला एकूण नफा याचा ताळेबंद कंपनीने संकेतस्थळावर अपलोड करावा. असे केल्याने नागरिकांना वस्तूस्थिती कळेल असे सांगण्यात येत आहे. त्या विभागातील प्रत्येक वीजग्राहकाला स्वतंत्र्य वीज मीटर देण्यात यावे. तसेच दरमहिन्याला या वीज मीटरचे अचूक रीडिंग घेऊन त्यानुसार वीजग्राहकाला बिल पाठवावे. अशी मागणी यावेळी करण्यात आली. अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीच्या अधिकारी संपदा जैन यांच्याकडे या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. लवकरात लवकर या मागण्यांची दखल घेण्यात येईल असे आश्वासन त्यांनी याप्रकरणी दिले आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@