अशोक चव्हाण असेपर्यंत महाराष्ट्रात कॉंग्रेसला ‘अच्छे दिन’ अशक्यच : राणे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Dec-2018
Total Views |
 

मुंबई नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला तीन राज्यांमध्ये मतदारांचा कौल मिळालामात्रमहाराष्ट्रात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण असेपर्यंत तसे शक्य नसल्याची टीका माजी खासदार निलेश राणे यांनी केली आहे. ‘देशात काँग्रेस जोरात आहे पण राज्यात काँग्रेस अपयशी ठरली आहेअशोच चव्हाण असेपर्यंत काँग्रेसला    राज्यात अच्छे दिन येणार नाही’, असा टोला त्यांनी ट्विटद्वारे लगावला आहे.

 
 
 

अशोक चव्हाण आणि नारायण राणेंमधील संघर्ष पुन्हा एकदा उफाळून येत आहे. राणे यांचे सुपूत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विटरवरुन अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली. तीन राज्यां विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला कौल मिळाला. छत्तीसगड, राजस्थानमध्ये काँग्रेसला बहुमत मिळाले. या पार्श्वभूमीवर नीलेश राणे यांनी ट्विटरद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. देशात कॉंग्रेस जोरात आहे पण महाराष्ट्रात अहमदनगरमध्ये शिवसेना, धुळेमध्ये भाजपा, नांदेड (लोहा) नगर पंचायतमध्ये भाजपाची सत्ता आली आहे. अशोक चव्हाण पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. काँग्रेसला देशात दिवस चांगले आलेत पण महाराष्ट्रात अशोक चव्हाण असेपर्यंत राज्यात काँग्रेसला अच्छे दिन येणार नाही’, असे त्यांनी सांगितले.

 

यामुळे अशोक चव्हाण आणि नारायण राणे यांच्यातील संघर्ष पुन्हा उफाळून आला आहे. गेल्या वर्षी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस समिती बरखास्त करून काँग्रेसने नारायण राणे यांना हादरा दिला. यामागे अशोक चव्हाणांचा हात असल्याचा आरोप राणें पितापुत्रांनी केला होता. अशोक चव्हाण हे राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी पात्र नसल्याची टीकाही त्यांनी केली होती.

  

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@