...तर निफ्टी 10 हजार बिंदूंच्याही खाली गडगडू शकतो !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Dec-2018
Total Views |

 
अखेर राजस्थान व छत्तीसगढ या राज्यांमध्ये भारतीय जनता पक्ष सत्तेवरुन पायउतार झालेला असल्याने व मध्य प्रदेशातही त्याची स्थिती हा लेख लिहिला जात आहे तोपर्यंत तरी डळमळीत असल्याने या तीन महत्वाच्या राज्यांमध्ये भाजपची कामगिरी समाधानकारक झालेली नसल्या च्या पार्श्वभूमिवर शेअर बाजार प्रभावित झालेला आहे.
 
अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) 10 हजार बिंदूंच्याही खाली गडगडण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे.
आता सर्वांच्या नजरा अंतिम फेरीतील लोकसभा निवडणुकांवर केंद्रित होणार असून तोपर्यंत तरी बाजारात मोठे चढउतार होऊ शकतात.
 
या दरम्यान आर्थिक वाढीचे प्रमाण घटण्याची दाट शक्यता असून देशांतर्गत सकल उत्पन्ना (जीडीपी)तील वाढीचा दर 7 टक्क्यांच्याही खाली जाण्याची शक्यता आहे.
 
गेल्या आठवडा भरापासून मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक (सेन्सेक्स) सुमारे 1300 बिंदूंनी कोसळलेला असून तो मतमोजणीच्या दिवशी मंगळवारी 11 रोजी सकाळी तब्बल 500 बिंदूंनी गडगडलेला होता. नंतर तो सावरुन 35 हजार 151 बिंदूंच्या उंचीपर्यंत गेलेला होता. तर निफ्टीही सुमारे दीडशे बिंदूंनी घसरुन 10 हजार 565 बिंदूंंपर्यंत वर आलेला होता.
 
 
आता यापुढील काही दिवस महत्वाचे असून बाजाराची नेमकी प्रतिक्रिया कोणती ते समजून येणार आहे. प्रदीर्घ काळाचा विचार केल्यास कंपन्यांची कमाई व अर्थव्यवस्थेची वाढ या गोष्टी गुंतवणुकदारांसाठी अधिक महत्वाच्या ठरणार्‍या आहेत.
 
 
म्हणून कुणीही राजकारणाला एवढे अवाजवी महत्व देऊ नये. याचे कारण म्हणजे जो कोणता राष्ट्रीय पक्ष सत्तेवर येईल त्याची धोरणे जवळपास सारखीच राहणार आहेत.
 
मग ते आघाडीचे किंवा एकाच पक्षाचे सरकार असो. बाजाराला राजकीय स्थैर्य अधिक महत्वाचे आहे. सर्वात चिंताजनक बाब ही आहे की आगामी तिमाहींमधील भारताच्या 7 टक्क्यांखालील वाढीमुळे चिंतित झालेले जगातील गुंतवणुकदार होय.
 
 
एक गोष्ट निश्चित आहे की भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था होय. पण जर भारताची आर्थिक वाढ 6.5 टक्क्यांच्याही खाली गेली तर मात्र बाजारावर त्याचा विपरीत परिणाम होऊन तो गडगडण्याची दाट शक्यता राहणार आहे.
 
 
नोटबंदीनंतर निवडणुकीत पैशाचा वापर बंद होण्याची अपेक्षा होती. पण या निवडणुकां दरम्यान मोठ्या प्रमाणावर पैसा वाटण्यात आल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.
 
 
या राज्यांमध्ये बर्‍याच ठिकाणी छापे मारुन प्रचंड रकमा जप्त करण्यात आलेल्या असल्या तरी त्या हिमनगाच्या वरच्या टोकाप्रमाणे असल्याची शक्यताही तज्ञांनी व्यक्त केली आहे.
 
 
वस्तुत: हा नेत्यांचा स्वत:चा दडवलेला काळा पैसाच होय. निवडून आल्यानंतर खर्च केलेला हा काळा पैसा वसूल करण्याकडेच ही नेतेमंडळी लक्ष देत असते. म्हणजेच हा ‘अर्थव्यवहार’ नसून तो जनहिताच्यादृष्टिने ‘अनर्थव्यवहार’च होय!
 
 
आयुष्मान भारत’ अंतर्गत आता आयुर्वेदातील उपचार पद्धतींचाही समावेश केला जाऊ शकतो. त्यात पंचकर्म आणि क्षारसूत्र चिकित्सांनाही स्थान राहणार आहे.
 
यासंबंधीचा प्रस्ताव आरोग्य मंत्रालयाने नॅशनल हेल्थ एजन्सी व नीति आयोगाकडे पाठविलेला आहे. आयुर्वेदिक व युनानी अंतर्गत मोफत उपचारही केले जाऊ शकतात. सिद्ध चिकित्सापद्धती नुसारही विनामूल्य उपचार शक्य आहेत. आयुष्मान भारत अंतर्गत ही सुविधा देशभरातील 79 आयुष इस्पितळांमध्ये मिळणार आहे.
 
 
वस्तू व सेवा कर(जीएसटी)विषयक वार्षिक परतावा पत्रके (अ‍ॅन्युअल रिटर्न्स) आता येत्या मार्चअखेरपर्यंत सादर करता येणार आहेत.
 
अर्थमंत्रालयाने व्यावसायिकांच्या मागणीनुसार त्यांना रिटर्न सादर करण्यासाठी ही तीन महिन्यांची मुदतवाढ दिलेली आहे. याआधी रिटर्न्स दाखल करण्यासाठी 31 डिसेंबर पर्यंत मुदत देण्यात आली होती.
 
 
या अ‍ॅन्युअल रिटर्न्समध्ये खरेदी विक्री व आयकर यांचा समावेश केलेला असतो. ही माहिती जीएसटीआर-9 व जीएसटीआर-9अ व जीएसटी 9ब मध्ये भरावयाची असते. जीएसटीआर-9 क मध्येही ही माहिती भरणे आवश्यक असते.
 
 
पुढील वर्षाच्या एप्रिल पासून सिंगल पेज सरल रिटर्न फॉर्म भरावा लागणार आहे. जीएसटी परिषदेच्या येत्या 22 डिसेंबर रोजी होणार्‍या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत यास अंतिम मंजुरी दिली जाणार
आहे.
 
कोसळेला शेअर बाजार शॉर्ट कव्हरिंगमुळे सावरला
 
 
गेल्या काही दिवसांपासून घसरत आलेला शेअर बाजार या आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोठ्या प्रमाणावर घसरलेला होता. आज दुसर्‍या दिवशी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणकांच्या पार्श्वभूमिवर तो सकाळी अधिकच गडगडलेला होता. पण नंतर झालेल्या शॉर्ट कव्हरिंगमुळे तो सावरला. मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक (सेंसेक्स) व राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) हे आज सकाळी अनुक्रमे 34 हजार 584 बिंदू व 10 हजार 350 बिंदूंवर उघडून दिवसभरातील व्यवहारात 35 हजार 207 बिंदू व 10 हजार 567 बिंदूंच्या उच्च आणि 34 हजार 426 बिंदू व 10 हजार 333 बिंदूच्या निम्न पातळीवर जाऊन आल्यानंतर अनुक्रमे तब्बल 190 बिंदू व 60 बिंदूंनी वाढून 35 हजार 150 बिंदू व 10 हजार 549 बिंदूंवर बंद झाले. बँक निफ्टीही 60 बिंदूंनी वधारुन 26 हजार 163 बिंदूंवर बंद झाला. इकडे भारतीय रुपया मात्र 1 रुपया 14 पैशांनी घसरुन प्रति डॉलरमागे 72 रुपये 47 पैशांपर्यंत गडगडला होता.
@@AUTHORINFO_V1@@