२०१९ मध्ये मतदारांचा मोदींवरच विश्वास; गुंतवणूक विश्लेषण संस्थांचे भाकीत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Dec-2018
Total Views |
 
 

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणूकांमध्ये मतदारांनी कॉंग्रेसला कौल दिला असला तरी हॉंगकॉंगची जागतिक गुंतवणूक विश्लेषण संस्था सीएलएसएने २०१९च्या निवडणूकांमध्ये मतदार पंतप्रधान नरेंद्र मोदींवरच विश्वास ठेवतील, असा अंदाज व्यक्त केला आहे. यानंतर बुधवारी शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी चौफर खरेदी केली.

 

सीएलएसएने मोदींचा करीश्मा कायम राहणार असल्याचे सांगत, राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) २४५ ते २८० जागा मिळणार असल्याचे सांगितले. पुन्हा सत्तेत येण्यासाठी इतके बहुमत पुरेसे असल्याने सध्याचे सरकार कायम सत्तेत राहील, असे भाकित सीएलएसएने केले आहे.

 

दरम्यान, समाजवादी पक्ष आणि बहुजन समाजवादी पक्षाशी हातमिळवणी केल्यास उत्तर प्रदेशमध्ये भाजपला अडचणी येतील, असे या संस्थेने म्हटले आहे. सीएलएसएनुसार, उर्वरित विधानसभा निवडणूकांपूर्वी सरकार अनेक लोकहीताचे निर्णय घेईल याशिवाय घोषणापत्रातील अनेक आश्वासनांची पूर्तता करण्याचाही प्रयत्न केला जाईल, त्यामुळे मतदारांचा विश्वास कायम राखण्यात मोदी सरकार यशस्वी ठरेल, असे सीएलएसएने म्हटले आहे. क्रेडिट सुईस या संशोधन संस्थेने शेअर बाजारात स्थानिक गुंतवणूक न वाढवल्यास चिंतेचे वातावरण निर्माण होईल, अशी सूचनाही दिली आहे. केंद्रात कोणाचे सरकार येईल, याबाबत आता सांगणे कठीण असल्याचेही यात म्हटले आहे.

 

युबीएस संस्थेने लोकसभेच्या २०१९ च्या निवडणूकांचा शेअर बाजारावर मोठा परिणाम होणार असल्याचे सांगत भाजपच सत्तेत कायम राहणार असल्याच्या आशेवर गुंतवणूकदार खरेदी करत असल्याचे म्हटले आहे. एचएसबीसीच्या अहवालानुसार, देशपातळीवर सरकार स्थिर राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे. अन्य राज्यांमध्येही जरी आत्ताची स्थिती कायम राहीली तर लोकसभा निवडणूकांच्या जागांमध्ये झालेल्या मतदाराच्या आकडेवारीवर परीणाम होणार नसल्याचे म्हटले आहे. सीटी या संस्थेने जीएसटीतील नियमांतील शिथिलता, प्रत्यक्ष करदात्यांना सुट मिळण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@