लोणावळ्याची प्रसिद्ध चिक्की बंद होण्याच्या मार्गावर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Dec-2018
Total Views |


पुणे : लोणावळ्यातील मगनलालचिक्की बंद होण्याच्या मार्गावर आहे. उत्पादनासंदर्भात त्रुटींवर बोट ठेवत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) 'मगनलाल फूड प्रॉडक्टस' कंपनीवर कारवाई केली. चिक्कीचे उत्पादन आणि विक्री थांबविण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले आहेत.

 

मगनलाल कंपनीच्या चिक्की उत्पादनात त्रुटी आढळल्या आहेत. अन्न व सुरक्षा कायद्याचा भंग होत असल्याने उत्पादकांना नोटीस बजावण्यात आली आहे. कंपनीचे भागीदार अशोक भरत अग्रवाल यांच्या उपस्थितीत एफडीएचे अधिकारी आर. आर. काकडे यांच्या पथकाने ही तपासणी केली. कंपनीने उत्पादित खाद्यपदार्थाची कोणतीच चाचणी तसेच तपासणी केली नसल्याचे या कारवाईतून पुढे आले आहे. विक्रीसाठी उत्पादित केलेला कोणताही खाद्यपदार्थ मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत तपासल्याशिवाय त्याची विक्री न करण्याचे आदेश एफडीएने दिले आहेत.

 

एफएसएआयच्या मान्यताप्राप्त प्रयोगशाळा अथवा स्वतःच्या प्रयोगशाळेत खाद्यपदार्थांची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. परंतू, तशी कोणतीच तपासणी करण्यात आली नसल्याचे समोर आल्यानंतर उत्पादन व विक्री थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या चिक्कीची तपासणी करणाऱ्या व्यक्तीची शैक्षणिक पात्रता बी.कॉम इतकी आहे. त्यामुळे पात्र व्यक्तीकडूनच तपासणी करुन घेण्याचे आदेश एफडीएकडून देण्यात आले आहेत. तोपर्यंत चिक्कीची विक्री न करण्यासही सांगण्यात आले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@