ज्ञानाचा अभाव अतिधोकादायक, गुंतवणूक नुकसानकारकच

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Dec-2018
Total Views |

कॅपिटल मार्केटविषयी चर्चासत्रात सूर

 
 
 
जळगाव : 
 
शेअर बाजाराविषयी ज्ञान, प्रशिक्षण याचा अभाव व अतिधोकादायक पद्धतीने केलेली गुंतवणूक नुकसानकारकच ठरते, असा रोटरी सेंट्रल आयोजित कॅपिटल मार्केटविषयी चर्चासत्रात तज्ज्ञांचा सूर उमटला.
 
गणपतीनगरमधील रोटरी हॉलमध्ये झालेल्या चर्चासत्रात तज्ज्ञ रौनक गाला व हर्षित शहा यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्ष एस. के.वाणी व मानद सचिव डॉ. पुष्पकुमार मुंदडा यांची प्रमुख उपस्थिती होती.
 
हर्षित शहा यांनी विविध माध्यमातून मिळणार्‍या टिप्स, न्यूज यांचा अभ्यास करून सत्यता पडताळावी. माहिती अचूक नसल्यास कसे नुकसान होते, याविषयी त्यांनी दोन कंपन्यांची उदाहरणे सांगितली.
 
प्रशिक्षणाविषयी शहा यांनी टेक्निकल व फंडामेंटल गुंतवणूक आणि स्किल मनेजमेंट याबद्दल माहिती दिली. आऊटसोर्सिंग करून म्युचुअल फंड वगैरे प्रकारात गुंतवणूक करता येते असे सांगितले.
 
रौनक गाला यांनी तांत्रिक विश्लेषण करताना किंमत व मागणी यांचे महत्त्व सांगून विचार प्रक्रिया बदलायला वेळ लागतो. गुंतवणूक तज्ज्ञ वॉरेन बफे यांचेदेखील 40% निर्णय चुकतात, असे सांगितले.
 
ट्रेडिंग आणि गुंतवणूक यात मानसिकतेचा फरक असून निर्णय चुकला तर नुकसान कमी आणि योग्य ठरला तर फायदा जास्त हा मंत्र गुंतवणूकदारांनी लक्षात ठेवावा तसेच शिस्त व मर्यादा पाळून गुंतवणूक करावी, असे आवाहन केले.
 
 
नॅशनल स्टॉक एक्स्चेंज अकादमीतर्फे घेण्यात येणार्‍या मॅनेजमेंट डेव्हलपमेंट प्रोग्राम या अभ्यासक्रमाचीदेखील माहिती देण्यात आली. सूत्रसंचालन व आभार राहुल जैन यांनी मानले.
@@AUTHORINFO_V1@@