किशोर कुळकर्णी यांच्या ‘आमची आई’ पुस्तकाचे प्रकाशन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Dec-2018
Total Views |

डॉ. भवरलाल जैन यांच्या जयंतीचे औचित्य

जळगाव : 
 
जैन इरिगेशनचे संस्थापक डॉ. भवरलालजी जैन यांच्या जयंतीच्या औचित्याने जैन इरिगेशनच्या प्रसिद्धी विभागातील सहकारी किशोर कुळकर्णी यांनी लिहिलेल्या ‘आमची आई’ या पुस्तकाचे प्रकाशन 12 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता, अध्यक्षांचे कार्यालय, जैन हिल्स जळगाव येथे होत आहे.
 
हे पुस्तक मुंबई येथील ग्रंथाली प्रकाशनाने प्रकाशित केले असून अशोक जैन यांच्या हस्ते व आनंद गुप्ते यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा होईल.
 
शरद डोंगरे, ग्रंथालीचे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर तसेच कार्यक्रमाच्या संयोजक धनश्री धारप हे या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
 
 
कोणत्याही यशस्वी पुरुषाच्या जडणघडणीत आपल्या आईचा महत्त्वपूर्ण वाटा असतो. जळगाव जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील 10 कर्तृत्ववान व्यक्तींना त्यांच्या आईने दिलेली शिकवण आणि आईच्या आठवणींचा जागर या पुस्तकात शब्दबद्ध करण्यात आलेला आहे.
 
 
यामध्ये कविवर्य ना. धों. महानोर, जैन इरिगेशनचे संस्थापक स्व. डॉ. भवरलालजी जैन, कुलगुरू डॉ. पी.पी. पाटील, आर.ओ. तात्या पाटील, भालचंद्र पाटील, नंदकुमार बेंडाळे, अनिल राव, अशोक जैन, श्रीराम पाटील, सदानंद धडू भावसार यांनी अत्यंत प्रेरणादायी अशा आठवणी सांगितल्या आहेत.
@@AUTHORINFO_V1@@