चांदसणीत आजपासून काळभैरव यात्रोत्सव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Dec-2018
Total Views |

नवसाला पावणारा देव; हजारो भाविक घेतात दर्शन


अडावद, ता.चोपडा : 
 
येथून जवळ असलेल्या चांदसणी-कमळगाव येथील जागृत देवस्थान श्री काळभैरव यात्रोत्सवास बुधवार, 12 डिसेंबरपासून प्रारंभ होत आहे. पंचक्रोशीतून तसेच जवळच्या राज्यभरातून सुमारे 3 ते 4 लाख भाविकभक्त यावर्षी दर्शनासाठी येतील, असा विश्वास मंदिराच्या विश्वस्तांनी व्यक्त केला आहे.
 
‘नवसाला पावणारा देव’ अशी देवस्थानाची ख्याती असल्याने मार्गशीर्ष शु. 5 पासून 2 दिवस चालणार्‍या या यात्रोत्सवात नवस फेडण्यासाठी हजारो भाविकभक्त येथे येत असतात.
 
लहान मोठ्या व्यावसायिकांची मोठी चलती असते. खान्देशातील यात्रोत्सवांचा शुभारंभच या मोठ्या यात्रेने होत असल्याने तसेच अवघ्या 2 दिवसात लाखो रुपयांची उलाढाल येथे होते.
 
अडावद, चांदसणी, कमळगाव, रुखणखेडा, पिंप्री, मितावली, देवगाव, पारगाव, वटार, सुटकार या गावांच्या ग्रामस्थांसाठी ही यात्रा सण असते.
 
 
अडावद ते कमळगाव या 6 कि. मी. रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असल्याने यावर्षी भाविकभक्तांचा प्रवास खडतर ठरणार आहे. तहसीलदार दीपक गिरासे यांच्या उपस्थितीत नुकत्याच झालेल्या बैठकीतही एस.टी. च्या अधिकार्‍यांनीही याविषयी प्रश्न उपस्थित केला होता.
 
 
जळगाव, यावल, अमळनेर, एरंडोल या आगारातूनही जादा बसेस मागविण्यात आलेल्या असून या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आगार प्रमुख किशोर अहिरराव, सहा. वाहतूक अधीक्षक राजेश देशपांडे, जगदीश सोळंके, कार्यशाळा अधीक्षक अनिल बाविस्कर, वाहतूक निरीक्षक संदीप तायडे, डी. एस. काटे, के. ए. सोनवणे, सरताज पठाण यांनी केले आहे.
 
 
अडावद पोलीस स्टेशनचे सपोनि राहुलकुमार पाटील यांनीही यात्रोत्सवात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी वाहतूक व बंदोबस्ताचे पुरेसे नियोजन केले असल्याचे ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.
@@AUTHORINFO_V1@@