पारोळ्यात इन्स्पायर अवॉर्ड राज्यस्तरीय प्रदर्शन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Dec-2018
Total Views |

राज्यभरातून 250 विद्यार्थ्यांचा आहे सहभाग


पारोळा : 
 
भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान, महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभाग तसेच वसंतराव मोरे तंत्रनिकेतन यांच्या संयुक्त विद्यमाने 12 ते 14 डिसेंबर या कालावधीत 7 वे इन्स्पायर अवॉर्ड राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन पारोळा तालुक्यातील टेहू येथील वसंतराव मोरे तंत्रनिकेतन येथे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती माजी खासदार अ‍ॅड. वसंतराव मोरे यांनी त्यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
 
ते पुढे म्हणाले की, 7 वे इन्स्पायर अवॉर्ड राज्यस्तरीय प्रदर्शनात राज्यभरातून 250 विद्यार्थी यात सहभागी होणार आहेत. त्यातून 26 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार असून त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याचे सांगितले.
 
प्रदर्शनात 250 विद्यार्थीं समवेत 500 शिक्षकांचा समावेश असणार आहे. प्रदर्शन सलग दोन दिवस सुरू असल्याने निवासाची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
 
यांची असणार उपस्थिती
 
माजी खा. वसंतराव मोरे, नाशिक विभाग शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव, प्राचार्य जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था डॉ. गजानन पाटील, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) भास्कर जगन्नाथ पाटील, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) देवीदास महाजन यासह दिग्गज मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. या दोनदिवसीय इन्स्पायर राज्यस्तरीय अवॉर्डमुळे तालुक्यातील विद्यार्थ्यांना बौद्धिक चालना मिळेल.
@@AUTHORINFO_V1@@