सायकल रॅलीद्वारे जनजागृती
पाचोरा :
शिवतीर्थ जयकिसान सोसायटीपासून प्रभाग 8 मध्ये आ. किशोर पाटील, महेश सोमवंशी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी सायकल रॅली काढण्यात आली.
सायकल रॅली रिंगरोडमार्गे जयराम कॉलनी, दत्त कॉलनी, जिजामाता कॉलनी, आदर्शनगर, रामदास ठाकरेनगर, विवेकानंदनगर, गो.से. हायस्कूल, मानसिंगकानगर, संघवी कॉलनी, महाराणा प्रताप चौक या प्रभागात सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी गोवर व रुबेला लसीकरणाबाबत माहिती देण्यात आली.
बालसेना शाखा प्रमुख सागर सोनार, वेदांत पाटील, कृष्णा पाटील, शुभम वाघ, हार्दिक जैन, स्पंदन सोमवंशी, स्वामी पाटील यांनी सायकल रॅलीचे निरीक्षण केले. बूथ प्रमुख, शिव साहाय्यक बंडू केशव सोनार, राजू पाटील, प्रवीण पाटील, किरण सूर्यवंशी आदी उपस्थित होते.