माजी खा.डॉ.गुणवंतराव सरोदे यांच्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Dec-2018
Total Views |

संघटन कौशल्यामुळे पक्षाला बळकटी...सर्वपक्षीय शोकसभेत श्रद्धांजली


जळगाव : 
 
जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे संघटन बलाढ्य करण्यात पक्षाचे माजी प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार स्व.डॉ.गुणवंतराव सरोदे यांचे संघटन कौशल्य आणि अनेक गुणांनी संपन्न, अजातशत्रू, व्यक्तिमत्त्व कारणीभूत राहिले. ‘भला माणूस’ असलेल्या डॉ.सरोेदे यांच्या निधनाने पक्ष व समाजाची मोठी हानी झाली आहे,
 
अशी भावना आज मंगळवारी 11 डिसेंबर रोजी सायंकाळी सर्वपक्षीय शोकसभेत व्यक्त झाली. भाजपतर्फे ब्राह्मण सभेत ही सभा झाली.प्रारंभी सर्वांनी त्यांच्या प्रतिमेला गुलाबपुष्प आणि पाकळ्या अर्पण करून श्रद्धांजलीपर अभिवादन केले.
 
 
माजी नगरसेवक उदय भालेराव यांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेत आठवणींनाही उजाळा दिला. नंतर पक्षाचे माजी प्रदेश संघटनमंत्री रवींद्र भुसारी यांनी त्यांच्या पक्षबांधणीतील कार्याबद्दल समयोचित विचार आणि शोकभावना व्यक्त केली.
 
 
आ. सुरेश भोळे, नगरसेवक कैलास सोनवणे, जि. प. चे सभापती पोपटतात्या भोळे, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष राधेशाम चौधरी, प्रा. हेमंत चौधरी, अभाविपचे पूर्वाश्रमीचे कार्यकर्ते निलेश झोपे यांनी आठवणींना उजाळा देत डॉ.सरोदे यांच्या गुणसमुच्चयाचा संदर्भ देत भावना व्यक्त केल्या. शेवटी सुभाष शौचे यांनी शांतीमंत्र म्हणवून घेतला.
 
 
नंतर स्तब्धता पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सूत्रसंचालन पक्षाचे प्रसिद्धीप्रमुख मनोज भांडारकर यांनी केले.
महापौर सीमा भोळे, माजी महापौर सदाशिवराव ढेकळे, स्थायी समितीचे सभापती जितेंद्र मराठे, गटउपनेते राजेंद्र घुगे पाटील, नगरसेविका भारती सोनवणे, पार्वताबाई भील, गायत्री राणे, नगरसेवक प्रा. सचिन पाटील, नवनाथ दारकुंडे, राजेंद्र मराठे, विशाल त्रिपाठी, महेश जोशी, नितीन इंगळे, महेश चौधरी, कुलभूषण पाटील, किशोर बाविस्कर, चेतन सनकत, प्रवीण कोल्हे, आशिष वाणी, भगतसिंग निकम, बी.एम.बडगुजर, शरिफा तडवी, मंगेश जोहरे, राहुल वाघ, गणेश माळी, दत्तात्रय जाधव, धुडकू सपकाळे, बबलू पठाण यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@