सुवर्णनगरीला बेरोजगारीचा शाप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Dec-2018
Total Views |

जिल्ह्यातील ‘टॅलेंट’ मुंबई अन् पुण्याकडे वळतंय


 
जळगाव : 
 
जळगाव जिल्ह्यात आणि आजूबाजूच्या परिसरात विद्यार्थ्यांमध्ये हव्या त्या संस्कारांबरोबर उत्तम ज्ञान असून त्यांना योग्य त्या रोजगाराच्या संधी जळगावात मिळत नसल्याने त्यांनी आपली धाव मुंबई आणि पुण्याकडे घेण्यात धन्यता मानली आहे.
 
यामुळे जळगाव शहराचा विकास खुंटत असल्याचे ‘तरुण भारत’च्या निदर्शनास आले आहे. जळगाव शहरात एमबीए, विधि महाविद्यालय, इंजिनिअरिंग त्याचबरोबर आयटीआय, सांस्कृतिक क्षेत्रात रस घेणारे खूप सारे विद्यार्थी असताना त्यांना आपली पुढील शिक्षणाची भूक बाहेर गावी जाऊन भागवावी लागत असल्याची वस्तुस्थिती आहे.
 
यामुळे शैक्षणिक खर्चाबरोबर आपले गाव सोडण्याची त्यांच्यावर पाळी येत असल्याने त्यांना या सर्व गोष्टींची तजवीज करतानाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
 
 
जळगाव शहरात औद्योगिक वसाहत असतानाही बोटावर मोजण्याइतक्या कंपनी असल्याने त्यांना त्यांच्या पात्रतेनुसार पगार मिळत नसल्याने तरुण हैराण झाले आहेत.
 
यामुळे शैक्षणिक पात्रता असूनही त्यांना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. काही तरुण हे गाव न सोडता जळगावाच कुठेतरी छोटी नोकरी करून आपल्या ज्ञानाचा उपयोग न करता मन मारून काम करावे लागत आहे.
 
 
जळगाव शहरात काही वर्षांपूर्वी काही कंपनी येण्याची चाहूल लागली होती तसा प्रस्तावही तत्कालीन नगरपालिकेला देण्यात आला होता. पण, काही सत्ताधार्‍यांनी आपल्या स्वार्थासाठी तसे होऊ न देता त्यांना हाकलून लावल्याची वस्तुस्थिती ‘तरुण भारत’च्या सर्वेक्षणात समोर आली आहे.
 
 
काही कंपन्यांचे कामगार हे दुसर्‍या कंपनीत जाणार असल्याची भीतीही यावेळी व्यक्त करून जळगाव शहरातील तरुणांना बेरोजगार ठेवण्यात या काही लोकांचा मोठा हात असल्याचे दिसून येते.
 
 
मात्र, जर याठिकाणी काही कंपन्यांनी आपली चूल मांडली असती तर आज आपले पाल्य आपल्यापासून दुरावले नसते, असा सूरही काही पालकांनी ‘तरुण भारत’कडे व्यक्त केला आहे.
 
 
यावर विद्यमान सत्ताधार्‍यांनी विचार करून जळगावात विविध कंपन्यांशी विचारपूस करून त्यांना जळगावात येण्याची परवानगी द्यावी, जेणेकरून बेरोजगारीच्या शापातून तरुण मुक्त होण्यास मदत होईल.
बेरोजगारीची टांगती तलवार
 
सुवर्णनगरी म्हणवणार्‍या जळगावात मात्र असंख्य तरुण आजही बेरोजगार भटकत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
 
शिक्षण झाल्यानंतर पुढे काय करायचे, असा सवालही त्यांच्या मनात येत असून ते आपले घर व पालकांना सोडून दुसर्‍या शहरात आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी जात आहेत.
 
परंतु, त्यांना रोजगाराची संधी जर जळगावातच मिळाली तर त्यांना कोणत्याही गावी जाण्याची गरज पडणार नाही, याचा विचार सत्ताधार्‍यांनी आता करायला हरकत नाही.
पाण्याची मुबलकता असूनही...
 
जळगाव शहरात पाण्याची मुबलकता असून यामुळे कंपन्या आजही जळगावात येण्यासाठी उत्सुक आहे. वाघूर आणि हतनूरचे वरदान असणार्‍या जळगावात मात्र,
 
आधीच वरचढ असलेल्या कंपनी आपल्या अस्तित्वाला कुठलाही धक्का लागता कामा नये, म्हणून त्यांना आजही शहरात येऊ न देता त्यांना परस्पर ‘थर्ड’ मारत असल्याचे निदर्शनास येत आहे.
 
अन्यथा एवढ्या मोठ्या शहरात केवळ बोटावर मोजण्याइतक्या कंपनी कशा, असा सवालही काही नागरिक करताना दिसून येत आहे.
@@AUTHORINFO_V1@@