भुसावळ-सुरत पॅसेंजर वेळेवर धावणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Dec-2018
Total Views |

फलाट उपलब्ध नसल्याचे कारण; खा.रक्षाताईंनी घेतली एडीआरएमची भेट

 
 
 
भुसावळ :
 
रावेर, बोदवड येथील जळगावला जाणार्‍या विद्यार्थी, व्यापारी व नागरिकांच्या सोईसाठी मागील महिन्यात झालेल्या बैठकीत खा. रक्षाताई खडसे यांनी इटारसी पॅसेंजर आल्यावर भुसावळ येथून जाणारी सुरत पॅसेंजर सोडण्याचे आदेश दिले होते.
 
मात्र, फलाट उपलब्ध नसल्याचे कारण देत हा निर्णय मागे घेण्यात आला असल्याचे खा. रक्षाताई खडसे यांनी सोमवार 10 रोजी एडीआरएम मनोजकुमार सिन्हा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सांगितले.
 
रावेर, बोदवड येथील विद्यार्थी व व्यापारी वर्ग जळगाव येथे कामानिमित्त ये-जा करीत असतात. मात्र, त्यांना जळगाव येथे वेळेवर गाडी उपलब्ध नसल्याने त्यांना जाण्यासाठी विलंब होतो.
 
यावर तोडगा काढण्यासाठी रेल्वे प्रवाशांनी खा. खडसे यांच्याकडे दाद मागितली होती. यावर मागील महिन्यात खा. रक्षाताई खडसे यांनी डीआरएम यांच्यासोबत झालेल्या बैठकीत इटारसी पॅसेंजर आल्याशिवाय सुरत पॅसेंजर सोडू नये, असा निर्णय घेतला होता.
 
 
मात्र, भुसावळ येथे इटारसी पॅसेंजरकरिता फलाट उपलब्ध नसल्यामुळे तसेच काही तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे इटारसी पॅसेंजर ही भुसावळ रेल्वे स्थानकावर वेळेवर येऊ शकत नाही.
 
त्यातच इटारसी पॅसेंजरला वेळ होत असल्यामुळे भुसावळ येथून जळगाव येथे जाणार्‍या प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत होते.
 
 
प्रसंगी वरिष्ठ परिचालन प्रबंधक स्वप्निल निला, सल्लागार समिती सदस्य अनिकेत पाटील उपस्थित होते. सुरत पॅसेंजर ही गाडी इटारसी पॅसेंजरची वाट न पाहता वेळेवर सोडण्यात येईल.
@@AUTHORINFO_V1@@