भारिपतर्फे भुसावळ, जामनेरला रास्ता रोको

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Dec-2018
Total Views |

चोपड्याचे पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांची बदली रोखण्यासाठी


 
 
भुसावळ :
 
चोपडा येथील पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांची गुरुवारी भाजप पदाधिकार्‍यांनी कॉलर पकडली होती, परिणामी भाजप पदाधिकार्‍यांना पोलिसांनी अटक केली होती.
 
त्याचा बदला म्हणून सत्तेचा उपयोग घेत भाजपने पो.नि. किसनराव नजनपाटील यांची तडकाफडकी बदली करवून आणल्याच्या निषेधार्थ भारिपने मंगळवारी रास्ता रोको करून निषेध केला आहे.
 
 
भारिप बहुजन महासंघातर्फे भुसावळ येथे मंगळवारी गांधी पुतळ्यासमोर रस्ता रोको करण्यात आला. रास्ता रोको अंदोलनात जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार, सचिव दिनेश इखारे, गणेश इंगळे, प्रल्हाद घारु, विद्यासागर खरात, रुपेश साळुंखे, प्रमोद बाविस्कर, बबन कांबळे, देवदत्त मकासरे, अरुण नरवाडे, अरुण तायडे, लक्ष्मण सरदार, तुषार जाधव, विजय सोनवणे उपस्थित होते.
जामनेर - चोपडा पोलीस ठाण्याचे पो.नि.किसनराव नजनपाटील यांनी भाजपाच्या पदाधिकारी यांच्यावर केलेली कारवाई योग्यच होती.
 
कारवाईबाबत भाजप पदाधिकारी यांनी पोलीस अधीक्षक, प्रशासनावर दबाव आणून पाटील यांची बदली करावयास लावण्यात आली.
 
त्याचाच निषेध म्हणून जामनेर तालुका भारिपतर्फे भुसावळ टी- पॉईंटवरील आंबेडकर चौकात रास्ता रोको केला. यावेळी तालुकाध्यक्ष सचिन सुरवाडे, भागवत सुरळकर, अक्षय निराले, कुंदन सुरवाडे, विक्की सुरवाडे, गौरव इंगळे, सौरव अवचारे, आदींंसह युनिटचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी हजर होते.
@@AUTHORINFO_V1@@