विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा उत्साहात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Dec-2018
Total Views |

 
 
जळगाव : 
 
विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने पूर्व प्राथमिक विभागात 7 रोजी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या क्रीडा प्रकारांमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
 
जीवनात खेळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक व्यक्तीसाठी व्यायाम आणि खेळ अत्यंत महत्त्वाचे असून खेळामुळे शारीरिक, बौद्धिक क्षमता वाढण्याबरोरबच आरोग्यही चांगले राहते आणि मन उत्साही होते आणि माणसाची दैनंदिन कामकाजातील कार्यक्षमताही वाढण्यास मदत होते.
 
विद्यार्थ्यांमध्ये खेळाबाबत आवड निर्माण होण्यासाठी 7 डिसेंबर शुक्रवार रोजी विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल पूर्व प्राथमिक विभागामध्ये क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
 
 
या क्रीडा स्पर्धांमध्ये नागमोडी धावणे, बादलीत बॉल टाकणे, लांब उडी, बुक बॅल्सिंग, धावणे, यासारख्या खेळांचा समावेश करण्यात आला होता. शाळेतील पूर्व प्राथमिक विभागातील नर्सरी ते सिनिअर के. जी. च्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या खेळांमध्ये सहभाग नोंदवून मनसोक्त आनंद उपभोगला.
 
 
या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन प्राचार्य ज्ञानेश्वर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पूर्व प्राथमिक विभागाच्या समन्वयिका सविता कुलकर्णी व शाळेतील शिक्षक उपस्थित होते. या क्रीडा स्पर्धांचे नियोजन कामिनी जावळे यांनी केले.
 
 
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्राचार्य ज्ञानेश्वर पाटील यांचे मार्गदर्शन व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
@@AUTHORINFO_V1@@