पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार समृद्धी महामार्गाचे भूमिपूजन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Dec-2018
Total Views |
 

नागपूर : राज्य सरकारचा महत्वकांशी प्रकल्प असलेला मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या भूमिपूजनाचा अखेर मुहूर्त ठरला आहे. येत्या १८ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या मार्गाचे भूमिपूजन केले जाणार आहे, पुढील आठवड्यात नरेंद्र मोदी राज्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते मुंबई मेट्रो कामांचेही भूमिपूजनही करणार असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली.

 

आत्तापर्यंत समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनाचे काम ९० टक्के पर्ण झाले आहे. त्यामुळे राज्य सरकार लवकरच समद्धी महामार्गाच्या कामाला सुरुवात करणार आहे. मंगळवार, १८ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन करतील.

 

राज्य सरकारने यापूर्वी काढलेल्या परिपत्रकानुसार, गौण खनिज मुरूम, दगड, माती शेतकऱ्यांनाही याचा फायदा मिळावा यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. शेतकऱ्यांना मोफत शेततळे तयार करून दिले जाणार आहे. यातून मिळणारे गौण खनिज महामार्गाच्या कामासाठी वापरणार आहे. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मोठ्या फायदा होणार आहे. समृद्धी महामार्ग हा संपूर्ण सहा पदरी रस्ता तीस महिन्यांत बांधण्याचे उद्दिष्ट आहे. पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन झाल्यानंतर समृद्धी महामार्ग जात असलेल्या प्रत्येक जिल्ह्या पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात येणार आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@