मुंदडा ग्लोबलमध्ये गोवर, रुबेला लसीकरण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Dec-2018
Total Views |

आ. शिरीष चौधरी यांच्या हस्ते शुभारंभ

 
 
 
अमळनेर :
 
शहरातील एन. टी. मुंदडा ग्लोबल व्ह्यू स्कूलमध्ये आ. शिरीष चौधरी यांच्या हस्ते गोवर, रुबेला लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला.
 
यावेळी एकूण 1,951 मुला-मुलींना गोवर, रुबेला लस देण्यात येऊन शहरात सर्वाधिक 91 टक्के लसीकरण करण्याचे उद्दिष्ट गाठल्याने आ. शिरीष चौधरी यांनी शालेय प्रशासनासह शिक्षक वृंदांचे कौतुक केले.
 
चेअरमन प्रकाश मुंदडा, प्रिन्सिपल लक्ष्मण लजपती, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास महाजन, डॉ. राजेंद्र शेळकर, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. प्रकाश ताळे, डॉ.जी. एम पाटील, डॉ. सुमित पाटील, श्रीराम चौधरी, अनिल महाजन, रमेश पाटील, किशोर माळी व कर्मचारी उपस्थित होते. शहरातील एकूण 14 हजार 989 विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. आ. चौधरी यांनी समाधान व्यक्त केले आहे.
@@AUTHORINFO_V1@@