संसद हिवाळी अधिवेशन : पंतप्रधानांचे विरोधकांना चर्चेसाठी आवाहन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Dec-2018
Total Views |
 

नवी दिल्ली : मंगळवारपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनालाही मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. नरेंद्र मोदी यांनी यावेळी संसदेतील कामकाजासंदर्भातील मत मांडले.

 

या अधिवेशनात जास्तीत जास्त लोकहिताची कामे करू, सर्व सदस्य या भावनेचा आदर करतील, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. सरकार जनहितासाठी विधेयक आणणार असून यावर चर्चा व्हावी. वादविवाद किंवा संवाद व्हावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.

 

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्वपक्षीय चर्चा बोलावली होती. दरम्यान या अधिवेषणात सुक्ष्म लघू व मध्यम उद्योजकांसाठी सरकार नवी योजना आणणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तिहेरी तलाक विधेयकही यावेळी संमत केले जाणार आहे. शिक्षण हक्क कायदा, मोटार वाहन, इंडियन मेकेनिकल कौन्सिल आदी मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता यावेळी व्यक्त केली जात आहे. दरम्यान आजच्या सत्रात केवळ भाषणे होणार असून खऱ्या अर्थाने चर्चेला बुधवारपासून सुरुवात होणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@