व्हॅनिटी व्हॅन चालकांचा संप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Dec-2018
Total Views |



मुंबई : व्हॅनिटी व्हॅन कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून बंद पुकारला आहे. करातून सवलत देण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे मालिका आणि चित्रपटांच्या चित्रीकरणावर परिणाम झाला आहे. कर्मचाऱ्यांच्या संघटनेने आझाद मैदान पोलिसांना निवेदन सादर केले. कलाकारांनी मात्र पाठिंबा दिलेला नाही, असे व्हॅनिटी व्हॅन कर्मचारी संघटनेतर्फे सांगण्यात आले.

 

कुठल्याही मालिका किंवा चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी कलाकारांच्या सोयीसाठी व्हॅनिटी व्हॅन असणे गरजेचे असते. परंतु त्यांनीच संप पुकारल्यामुळे चित्रीकरणावर याचे परिणाम दिसत आहेत. महाराष्ट्रात "व्हॅनिटी व्हॅन'च्या मालकांना दरमहा पाच हजार रुपये प्रतिचौरस फूट या दराने कर भरावा लागतो. हा कर कमी करावा, या मागणीसाठी त्यांनी संप पुकारला आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात संप सुरू झाल्यामुळे अनेक चित्रपटांच्या चित्रीकरणात अडचणी येत आहेत.

 

अक्षय कुमारच्या 'केसरी' चित्रपटाचे चित्रीकरण फिल्मसिटीमध्ये सुरु आहे. तसेच अजय देवगणच्या 'तानाजी' चित्रपटाचे फिल्मिस्तानमध्ये चित्रीकरण सुरू आहे. त्या ठिकाणी मेकअप रूम तयार करण्यात आल्या असल्या, तरी व्हॅनिटी व्हॅनमधील सोयी-सुविधा उपलब्ध नाहीत, असे 'व्हॅनिटी व्हॅन' कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष केतन रावल यांनी सांगितले. संघटनेने कर कमी करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना ट्‌विटद्वारे केली आहे, असे त्यांनी सांगितले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@