जम्मू काश्मीर चौकीवर दहशतवादी हल्ला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Dec-2018
Total Views |



श्रीनगर : दहशतवाद्यांच्या कारवाया काही केल्या थांबत नाही आहेत. मंगळवारी दुपारच्या सुमारास जम्मू काश्मीरमधील शोपीयान जिल्ह्यातील पोलिसांच्या चौकीवर हल्ला केला. यामध्ये ३ पोलिसांना वीरगती प्राप्त झाली आहे आणि १ पोलीस जखमी झाला आहे.

 

झैनपोरा पोलीस चौकीवर दुपारच्या सुमारास दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. या गोळीबारात तीन पोलीस शहीद झाले. तर एक जवान जखमी झाला आहे. गोळीबारानंतर पोलिसांकडील रायफल हिसकावून दहशतवादी पसार झाल्याचे सांगण्यात येत आहे. जखमी जवानाला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे, अशी माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिली. हल्ल्यानंतर परिसराला घेराव घातला असून, दहशतवाद्यांचा शोध घेण्यात येत आहे, असेही पोलिसांनी सांगितले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@