LIVE : तेलंगणामध्ये पुन्हा टीआरएस

    11-Dec-2018
Total Views |
 

 

 तेलंगणा विधानसभा निकाल (११९) - टीआरएस : ८४; कॉंग्रेस : ३६; इतर : ९ 

 
हैदराबाद : तेलंगणा राज्यातील केसीआर यांनी मुदतीपूर्वीच विधानसभा बरखास्त केल्यानंतर मंगळवारी या राज्यातल्या निवडणुकांसाठी मतमोजणी सुरू आहे. यापूर्वीच्या निवडणुकीत केसीआर यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीला ६३ जागा मिळाल्या होत्या.
 

त्यामुळे केसीआर पुन्हा सत्ता खेचून आणतात का हे आज पाहायला मिळणार आहे. तेलंगणात ११९ जागांसाठी मतमोजणी सुरू असून विधानसभा बरखास्तीनंतर लागलीच केसीआर यांनी १०५ उमेदवारांची घोषणा केली. तेलंगणातील ११९ जागांसाठी सर्वच पक्षांच्या मिळून १८२१ उमेदवारांचे राजकीय भविष्य मतदान यंत्रात कैद झाले होते.

 

टीआरएसवर दुपारपर्यंत ८४, कॉंग्रेस टीडीपी २६, भाजप आणि इतर अशी आघाडी होती. टीआरएसचे अध्यक्ष रामाराव यांना २० हजार ४७१ मते मिळाली, त्यांचे कॉंग्रेसचे विरोधक हजार ३७५ यांना मते मिळाली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.