शेअर बाजार धक्क्यातून सावरला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Dec-2018
Total Views |
 

मुंबई : निवडणूक निकालांच्या परिणामांमुळे मंगळवारी जोरदार आपटलेले शेअर बाजाराचे दोन्ही निर्देशांक वधारत बंद झाले. गुंतवणूक सल्लागारांनी याचा प्रभाव आणखी काही काळ जाणवू शकतो, असा अंदाज व्यक्त केला आहे.

 

निवडणूकीचे निकाल आणि उर्जित पटेल यांचा राजीनामा, रुपयाचे अवमुल्यन याचा एकत्रित परिणाम दोन्ही निर्देशांकावर जाणवला. सकाळी बाजार उघडताच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स पाचशे अंशांनी गडगडला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ५० अंशांनी गडगडला. दरम्यान दुपारच्या सत्रात गुंतवणूकदारांनी खरेदी केल्याने सेन्सेक्स १९०.२९ अंशांनी वधारत ३५ हजार १५०.०१ वर बंद झाला तर निफ्टी ६०.७० अंशांनी वधारत १० हजार ५४९.१५ इतका स्तर गाठला.

 

दुपारी अडीच वाजेपर्यंत सेन्सेक्सचे १९ शेअर वधारले तर १२ शेअरची घसरण झाली. निफ्टीतील ३४ शेअरमध्ये खरेदी तर अन्य १६ शेअरमध्ये विक्री झाली. येस बॅंक, सन फार्मा, अॅक्सिस बॅंक, एशियन पेट्स, एसबीआय, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, आयटीसी, कोल इंडिया, विप्रो, टीसीएस आदी सहा टक्क्यांपर्यंत शेअर वधारले.

 

निफ्टीमध्ये येस बॅंक, सन फार्मा, एशियन पेंटस्, अॅक्सिस बॅंक, एचसीएल आदी शेअर पाच टक्क्यांपर्यंत वधारले. डॉलरच्या तुलनेत रुपया १३० पैशांनी घसरला. सकाळच्या सत्रात तो डॉलरच्या तुलनेत ७२.३२ वर बंद झाला. याचा परिणाम तेल कंपन्यांच्या शेअरवर जाणवला. एचपीसीएल .९१ टक्के, बीपीसीएल .०६ टक्के, इंडियन ऑईल कॉर्प .७९ टक्के, बीपीसीएल .०६ टक्क्यांनी घसरत बंद झाले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@