मी जय, विरु उद्धव आणि गब्बर पवार : रामदास आठवले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Dec-2018
Total Views |

 


 
 
 
मुंबई : कलर्स मराठी वाहिनीवरील मकरंद अनासपुरे यांचा ‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने’ हा कार्यक्रम सध्या खूप लोकप्रिय होत आहे. राजकारण्यांपासून ते कलाकरांपर्यंत आजवर अनेक दिग्गज मंडळीनी या क्रार्यक्रमात हजेरी लावली आहे. या कार्यक्रमात नेते रामदास आठवले आणि गायक आनंद शिंदे यांनीही हजेरी लावली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी या दोन्ही पाहुण्यांशी दिलखुलास गप्पा मारल्या. कार्यक्रमाचा हा एपिसोड येत्या गुरुवारी आणि शुक्रवारी प्रसारित होणार आहे.
 

रामदास आठवले हे त्यांच्या कवितांसाठीही प्रसिद्ध आहेत. हे तर सर्वांनाच ठाऊक आहे. परंतु रामदास आठवले यांना हे काव्य सुचत तरी कसे आणि कुठून? कविता करण्याची सुरुवात कशी आणि केव्हा झाली? याचे गुपित त्यांनी या कार्यक्रमात सांगितले आहे. त्यामुळे या एपिसोडची रंगत आणखी वाढली आहे. शोले सिनेमाचा रिमेक करायचा झाल्यास तुम्ही राजकारणातील कोणत्या व्यक्तीला कोणती भूमिका द्याल तसेच तुम्हाला कोणती भूमिका साकारायला आवडेल?” असा मजेशीर प्रश्न या कार्यक्रमात मकरंद अनासपुरे यांनी रामदास आठवले यांनी विचारला. अमिताभ यांनी साकारलेली जयची भूमिका मी करेन. धर्मेंद यांनी साकारलेली विरुची भूमिका उद्धव ठाकरे देईन. तर गब्बरच्या भूमिका शरद पवार यांना दिली असती.” असे गमतीशीर उत्तर आठवले यांनी दिले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@