LIVE - मध्यप्रदेश विधानसभा निवडणूक : २०१८

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Dec-2018
Total Views |

 


 
 
मध्यप्रदेश :  गेल्या १५ वर्षांपासून मध्यप्रदेशात भाजपची एकहाती सत्ता आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजपचा विजय झाला, तर मध्यप्रदेशात सलग चौथ्यांदा भाजपची सत्ता येईल. परंतु शिवराजसिंह चौहान यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजप मध्यप्रदेशात आपली सत्ता कायम राखणार का ? हे पाहण्यासाठी निवडणुकीच्या अंतिम निकालाची वाट पाहावी लागणार आहे. जाणून घ्या मध्यप्रदेशातील  विधानसभा २०१८ च्या निवडणुकीच्या निकालाचे लाइव्ह अपडेट्स...
 
    • > मध्यप्रदेशात सत्ता स्थापनेसाठी हवे ११६ जागांचे बहुमत 

    • > मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची भाजपच्या प्रमुख नेत्यांसोबत बैठक, सत्ता स्थापनेच्या चर्चेची शक्यता

    • > संध्याकाळी ४ वाजून ४७ मिनिटांनी : काँग्रेस ११५ जागांनी आघाडीवर तर भाजपला १०५ जागा

    • > संंध्याकाळी ४ वाजता : काँग्रेसची ११४ जागांवर आघाडी तर भाजपला १०६ जागा

    • > दुपारी ३ वाजून १० मिनिटांनी : भाजप १११ जागांवर आघाडीवर तर काँग्रेसला १०८ जागा 

    • > दुपारी १ वाजून ५१ मिनिटांनी : भाजप पुन्हा १११ जागांवर आघाडी तर काँग्रेसला १०९ जागा

    • > दुपारी १ वाजून ४४ मिनिटांनी : भाजपला ११० तर काँग्रेसला १०७ जागा

    • >  दुपारी १ वाजता : मध्यप्रदेशात एकूण २३० जागांपैकी ११३ जागांवर काँग्रेस आघाडीला आहे. तर भाजपला १०७ जागा मिळाल्या आहेत.  

    • >  दुपारी १२ वाजता : मध्यप्रदेशात भाजपला १०३ जागा मिळाल्या असून काँग्रेस ११६ जागांवर आघाडीवर आहे.

    • > मध्य प्रदेशात काँग्रेसचीच सत्ता येणार, असा विश्वास काँग्रेस नेते कमलनाथ यांनी व्यक्त केला आहे.

    • > मुख्यमंत्री शिवराज चौहान हे बुधनी मतदारसंघातून आघाडीवर आहेत.

    • > दरम्यान, मध्यप्रदेशातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांच्या घरी जाऊन काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी भेट घेतली.

    • > ७ ते ८ आमदार भाजपच्या संपर्कात, सूत्रांची माहिती 

    • > मध्य प्रदेशात काँग्रेसला पक्षांतर्गत कुरबुरीचा फटकाही बसू शकतो. याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.


 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@