शस्त्र निर्यातीत भारताचा चौथा क्रमांक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Dec-2018
Total Views |



नवी दिल्ली : एकेकाळी जगातील सगळ्यात मोठा शस्त्रांचा आयात करणारा देश म्हणून ओळखला जाणारा भारत आता शस्त्र निर्यात करणाऱ्या देशांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. स्टॉकहोल्मच्या पीस रिसर्च इन्स्टिट्यूट केलेल्या सर्वेक्षणात हे समोर आले. शस्त्र निर्यात करण्यामध्ये भारताचा जगात चौथा क्रमांक लागतो.

 

गेले काही वर्ष भारत या शस्त्र आयात केली जायची. पण शस्त्र आयात करताना शस्त्र निर्मिती भारतात व्हावी अशा आशयाचे करार भारताने केले. रशिया, अमेरिका,चीनच्या धरतीवर संरक्षण तंत्रज्ञान भारतात विकसित करण्यात आले आहेत. गेल्या १० वर्षांत मोठ्या प्रमाणात मिसाइल्स आणि उपग्रहांची निर्मिती भारतीय शस्त्राज्ञांनी केली आहे. भारताचा या क्षेत्रातला वृद्धीतील दर हा अमेरिकेहूनही जास्त आहे असे समोर आले. तेव्हा येत्या काळात भारत संरक्षण क्षेत्रातील एक बळकट ताकद म्हणून उदयास येईल अशी आशा व्यक्त केली जाते आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@