आयुष्यमान योजनेअंतर्गत आयुर्वेदीक उपचार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Dec-2018
Total Views |
 
 

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या महत्वकांशी योजनेत आता आयुर्वेदीक उपचारांचाही सामावेश केला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामध्ये पंचकर्म चिकित्सा, क्षार सुत्र, कंपिंग थेरपी आदी उपचारांचा सामावेश केला जाणार आहे.

 

केंद्रीय आयुष्य मंत्रालयाने या संबंधीत प्रस्ताव निती आयोगाकडे पाठवण्यात आला आहे. आयुर्वेदीक युनानी औषधोपचार पद्धतीद्वारे मोफत उपचार शक्य आहेत. देशातील ७५० रुग्णालयांमध्ये आयुषमान योजनेअंतर्गत उपचार केले जाणार आहेत.

 

आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत ५ लाख ३७ हजार कुटूंबांनी नोंदणी केली आहे. अद्याप २० लाख कुटूंबांची नोंदणी शिल्लक आहे. आधार नोंदणीनंतर प्रथमच आयुषमान नोंदणी केंद्रासाठी ग्रामीण भागात लांबच लांब रांगा लागत आहे. या नोंदणीमध्ये जम्मू काश्मिर हे राज्य आघाडीवर आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@