हॅप्पीवाला ‘फिलिंग डॉट कॉम’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Dec-2018
Total Views |



दर नव्हे, तर प्रेमळ माणुसकीची ऊबच. हे सुत्र घेऊन रविवारी याच कार्यक्रमांतर्गत ऐरोली ते वाशी या भागातील फुटपाथ, ब्रिज किंवा सिग्नलवर वस्ती करून राहणाऱ्या गरीब-गरजूंमध्ये १५१ ब्लँकेट्स वाटपाचे काम करण्यात आले.


दर नव्हे, तर प्रेमळ माणुसकीची ऊबच. हे सुत्र घेऊन रविवारी याच कार्यक्रमांतर्गत ऐरोली ते वाशी या भागातील फुटपाथ, ब्रिज किंवा सिग्नलवर वस्ती करून राहणाऱ्या गरीब-गरजूंमध्ये १५१ ब्लँकेट्स वाटपाचे काम करण्यात आले. ही ब्लँकेट्स आपल्या मित्रपरिवाराच्या मदतीने गोळा केली आणि विशेष म्हणजे, या कार्यात कोपरखैरणे वाहतूक नियंत्रण दलातील अधिकार्‍यांनीदेखील मोलाची मदत केलेली आहे. लेखन ही माझी आवड आहे. ‘या भूमीवर जन्मलो आपण, या भूमीला आपलं देणं आहे,’ या विचारांवर प्रेरित लेखन ब्लॉगच्या माध्यमातून www.happywalifeeling.com या स्वत:च्या संकेतस्थळावर गेल्या काही महिन्यांपासून मी लेखन करतो. थंडीचा सगळ्यात जास्त त्रास हा प्राण्यांना आणि फुटपाथवर झोपणाऱ्या गोर-गरिबांना होतं असून या ब्लँकेट्स किंवा चादर वाटपाच्या माध्यमातून हाच त्रास थोडा का होईना, कमी करण्याचे कार्य ‘Project Warm Wishes’च्या टीमने केलेले आहे. काल या कार्यक्रमात एकूण पाचजणांची टीम सामील असून त्यांची नावे आरती, मधुरा, विशाल आणि प्रशांत अशी आहेत. या यशस्वी कार्यानंतर पुढील काळात असे बरेच उपक्रम करण्याचा ध्यासदेखील आम्ही घेतला आहे.

 

एका महिन्यापूर्वी म्हणजे ३ नोव्हेंबर तारखेला माझा मुलगा ऋत्विक याचा तिसरा वाढदिवस घणसोली नोड सिग्नलवर राहणाऱ्या लोहार कुटुंबासोबत साजरा करताना तिथे सकाळच्या गुलाबी थंडीत तहानुल्या बाळाला कुडकुडताना पाहिले आणि तेव्हाच आपण काहीतरी करायला हवे हा विचार डोक्यात फिरू लागला. काही केले तरी त्या बाळाचा चेहरा नजरेसमोरून जात नव्हता. नवी मुंबईच्या वाहतूक नियंत्रण शाखेच्या नागरिक सतर्कतेविषयी बऱ्याच कार्यक्रमांत मी सहभागी असतो. ण योगायोग म्हणजे नेमकं दुसऱ्याच दिवशी तेथील अधिकारी संतोष आव्हाड आणि सुरज कांबळे यांनी मला बोलावून काहीतरी सामाजिक समरसतेचा कार्यक्रम करण्याची इच्छा दर्शवली. थोडाही वेळ न घालवता त्यांना नजरेसमोर दिसलेला गरीब वस्तीत राहणाऱ्या लोकांमधला थंडीचा त्रास सांगितला. चादर किंवा ब्लँकेट वाटून आपण हा त्रास थोडा तरी कमी करू शकतो, याची खात्री दिली. अगदी लगेचच त्यांनीही होकार दिला आणि “आम्ही तुला जास्तीत जास्त सहकार्य करू,” असं सांगितलं. त्यांचा हा होकार म्हणजे माझ्या मनातील खेदावर एक सकारात्मक फुंकरच होती जणू. घरी येऊन सगळी माहिती बायकोला आणि आईला सांगितली. त्या दोघीही खूश झाल्या. कार्यक्रम करायचा, हे तर ठरलं. पण तो कसा? कधी? आणि ब्लँकेट्स कुठून गोळा करायची, ती पण किती? याचा आतापर्यंत काहीच विचार केला नव्हता. दुसऱ्या दिवशी निशूने (बायकोने) चांगली कल्पना दिली. “दिवाळीला फराळ वनवासी पाड्यात वाटपासाठी एक छान पोस्ट तुम्ही बनवली होती आणि फराळ गोळा केला होता. तशीच एक पोस्ट या संदर्भात बनवा आणि आपण ती व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि तुमच्या ब्लॉग, संकेतस्थळावर पोस्ट करू. करतील लोक मदत आपल्याला.” मला ते पटलं. तशी एक पोस्ट बनवली. प्रत्येक ठिकाणच्या माझ्या मित्रांचे संपर्क क्रमांक स्थानिक प्रतिनिधी म्हणून दिले. त्यांचा एक व्हॉट्सअॅप ग्रुप बनवला, ज्याचं नाव ठेवलं होतं ‘Project Warm Wishes’ आणि केली पोस्ट अपलोड केली सोशल मीडियावर. टॅगलाईन ठेवली होती, ‘चादर नव्हे, तर प्रेमळ माणुसकीची ऊबच जणू.’ बघता बघता ती पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आणि ठाणे, भांडुप, वाशी, घणसोली भागांतून माझ्या प्रतिनिधींना लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळू लागला. अवघ्या २० दिवसांत आम्ही ७० ब्लँकेट्स गोळा केली, त्यात काही नवी, तर काही जुनी होती... पण वापरण्यायोग्य होती.

 

आम्ही वाटपाची तारीख नक्की केली आणि वाटपाआधी संपूर्ण भागात फिरून संख्येचा अंदाजा घेण्याचा मी निर्णय घेतला. तसा माझ्यासोबत या कामात येण्यासाठी काहीजणांना फोनही केले. परंतु, नोकरी आणि वैयक्तिक कामामुळे कोणाला जमले नाही. मग, मी एकट्यानेच सर्वेक्षण करायचे ठरवले. सुरुवात ऐरोलीपासून केली आणि शेवट वाशी ब्रिज इथे केली. या पट्ट्यात फुटपाथजवळ, सिग्नलवर किंवा रेल्वे स्थानकाजवळ गरीब वस्त्यांमध्ये जवळपास १५० लोकं राहतात हे मला कळले. ही संख्या घेताना माझा अख्खा दिवस गेला होता. पण हे करत असताना ब्रिजखाली टोपल्या बनवणाऱ्या कुटुंबाकडून जगण्याचा सकारत्मक दृष्टिकोनही शिकता आला. विशेष म्हणजे आजचे माझे जेवण मी अशाच एका वस्तीत केले होते. रात्री घरी आल्यावर ग्रुपवर सगळ्या प्रतिनिधींकडून संख्या घेतली आणि ती होती सत्तर आणि हेतू साध्य करण्यासाठी अजून ८० ब्लँकेट्स कमी पडत होती. कार्यक्रम अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला होता. थोडी काळजी होती पण, तितकाच विश्वास होता की होईल व्यवस्था काहीतरी. देव पण चांगल्या कार्यात आपल्या पाठीशी उभा असतो. दुसऱ्या दिवशी सकाळी मला विशाल नावाचा माझ्या एका फेसबुक मित्राचा फोन आला, ज्याला मी आजवर कधी प्रत्यक्षात भेटतो नव्हतो. त्याने सांगितलं, “दादा, तुझ्या पोस्टनुसार मी २० ब्लँकेट्स ऐरोली भागातून गोळा केली आहेत.” ते ऐकून इतकं बरं वाटलं की सांगू नका. त्याच दिवशी दुपारी समीर नावाचा इगतपुरी इथून मित्राचा फोन आला. त्याने सांगितले,“ या उपक्रमाला मला मदत करायची आहे पण, तिकडे रिसॉर्ट असल्याने इकडे येता येत नाही.” याच्यावर मार्ग म्हणून त्याने काही रक्कम PayTm ट्रान्सफर केली. तशी मी ती नाकारण्याचा प्रयत्न केला पण, त्याच्या आग्रहाखातर मी घेतली. अशीच दिवसअखेर जवळपास ३० ब्लँकेट्सची मदत जमा झाली आणि राहिलेली २० ब्लँकेट्स वाहतूक नियंत्रण कक्षाने दिली. खरंच एकदा मनापासून खूप सारे आभार ज्यांनी ‘Project warm wishes’ मध्ये आपल्या माणुसकीच्या मदतीचा हात पुढे केला.

 

खूप जास्त ‘happywalifeeling’ अनुभवता आली. या उपक्रमातून सगळंच चांगलं बोलून कसं चालेल. हे कार्य करताना काहीजणांनी मला उलट प्रश्नदेखील केले की, हे असं काम करून तू या लोकांना अजून दुबळं तर बनवत नाहीस ना... तसा प्रश्न अजिबातच चुकीचा नव्हता पण, दृष्टिकोनात फरक होता. कारण, हा प्रकल्प तर एक मार्ग होता या लोकांच्या जवळ जाण्याचा. माझा हेतू तर तसा फार मोठा आहे पण, मी तो आत्ताच सांगणार नाही. कारणं हवा करून उगीच नाव करणं मला आवडतं नाही. मी प्रत्यक्षात करून दाखवण्यावर विश्वास ठेवतो आणि ते तुम्हाला येत्या वेळेत पुढच्या उपक्रमातून कळेलच. शेवटी पुन्हा एकदा जरूर सांगेन, वेळ काढून एकदा ‘www.happywalifeeling.com’ वर जरूर जा आणि एखादा तरी लेख जरूर वाचा...तुम्हाला नक्कीच भारतभूमीच्या देण्याची आपली जाण नक्की होईल. टॅगलाईन नुसार प्रेमळ माणुसकीची ऊब नक्कीच गोरगरिबात पोहोचवायचं काम उपक्रमामार्फत केले आहे. आता उत्सुकता पुढिल उपक्रमाची.

 

- विजय माने

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@