दैनिक जळगाव तरुण भारतचे भाकित खरे ठरलेशेंदुर्णीत कमळ फुलले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Dec-2018
Total Views |
 
 
दैनिक जळगाव तरुण भारतचे भाकित खरे ठरले
शेंदुर्णीत कमळ फुलले
 
जळगाव, 10 डिसेंबर
जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी नगरपंचायतीच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकित कमळ फुलणार हे भाकित जळगाव तरुण भारतने प्रसिध्द केले होते. 10 रोजी झालेल्या मतमोजणीत नगरपंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्षपदी भाजपाच्या खलसे विजया अमृता या निवडुन आल्या आहेत. तसेच नगरसेवक पदाच्या 17 जागांपैकी 13 जागी भाजपाचा तर 3 जागी राष्ट्रवादी काँग्रेस व एक जागा काँग्रेसने जिंकली आहे. मनसे व शिवसेनेला 3 आकडी मतेसुध्दा मिळाली नाहीत. काही प्रभागात मनसे व शिवसेने ला मिळालेल्या मतांपेक्षा नोटाला अधिक पसंती मिळाली आहे.
जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी ग्रामपंचयातीचे रुपांतर नगरपंचायतीत झाले असून पहिलीच सार्वत्रिक निवडणुक झाली. 9 रोजी मतदान होवून 10 रोजी मतमोजणी झाली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भा.ज.पा.साठी ही निवडणुक प्रतिष्ठेची ठरली होती.ना.गिरिष महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय गरुड यांच्यातील हा अप्रत्यक्ष सामनाच होता.या निवडणुकित मतदारांनी ना.गिरिष महाजन यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपाला बहुमत दिले.
नगराध्यपदासाठी खलसे विजया अमृत (भा.ज.पा.) 7745, गरुड क्षितीजा प्रविण (राष्ट्रवादी काँग्रेस)5253, चौधरी सरिता प्रकाश (मनसे) 88, बारी मनिषा विलास (शिवसेना) 168 आणि नोटा 69 तर प्रभाग निहाय
प्रभाग क्र. १
अहिरे रेखा विलास (रा काँ ) ३१३
धुमाळ रंजना विजय (भा.ज.प ,विजयी) ६३४
प्रभाग क्र. २
गायकवाड ज्योती संजय (भा.ज.पा ,विजयी) ४२४
निकम निर्मला विजय (रा काँ ) २३० )
प्रभाग क्र. ३
पाटील गणेश किसन (भा.ज.पा ,विजयी) ४९२
शहा नबी शकूर (रा काँ ) ३७०
प्रभाग क्र. ४
धनगर चंद्रभागा माधव बागवान (रा काँ विजयी) ३१७
नफीसाबी इलियास (भा.ज.पा ) २१५
प्रभाग क्र. ५
धनगर राहुल जग्गनाथ (भा.ज.प ,विजयी) ४३१
धनगर श्रीराम काशिनाथ (रा काँ ) ४२०
प्रभाग क्र. ६
अग्रवाल चंदाबाई गोविंद (भा.ज.प ,विजयी) ५१२
भावसार संगीता गोवर्धन (किशोर) (रा काँ ) २५०
प्रभाग क्र. ७
जैन भावना धीरज (रा काँ विजयी ) ३२९
ललवाणी सुशिलाबाई संदीप (भा.ज.प ,) २६२
प्रभाग क्र. ८
खाटीक मोहसीना फारूक ( काँग्रेस , विजयी ) ५०३
सय्यद सुमैय्याबी मसूद (भा.ज.प ) ३५८
प्रभाग क्र.९
बारी सुनीता भास्कर (रा काँ ) २३३
बारी साधना शंकर (भा.ज.प ,विजयी) ५४९
प्रभाग क्र.१०
बारी धनराज अर्जुन (रा काँ ) २०६
बारी सतीश श्रीराम (भा.ज.प ,विजयी) ४१६
प्रभाग क्र.११
फासे प्रसन्ना विठ्ठल (रा काँ ) २३८
गुजर शाम अरुण (भा.ज.प ,विजयी) ६००
प्रभाग क्र.१२
गरुड प्रवीण रमेश (रा काँ ) ३५८
थोरात निलेश उत्तम (भा.ज.प ,विजयी) ३८७)
प्रभाग क्र. १३
गरुड अंबरीश काशीनाथराव (काँग्रेस) ३२६
जोहरे गणेश वसंत (भा.ज.प ,विजयी) ३६४
प्रभाग क्र. १४
गुजर वृषाली योगेश (रा काँ ) ५२९
सूर्यवंशी मोनाली पंकज (भा.ज.प ) ५२७
प्रभाग क्र.१५
तडवी गाणी हबीब (काँग्रेस) १३८
तडवी अलीम बुरहान (भा.ज.प ,विजयी) ४७९
प्रभाग क्र. १६
बारी नंदकिशोर किसन (रा काँ ) ८८
बारी शरद बाबुराव (भा.ज.प ,विजयी) ४३१
प्रभाग क्र.१७
बारी कल्पना गजानन (रा काँ ) ९४
बारी संगीता योगेश (भा.ज.प ,विजयी) ५४३
 
@@AUTHORINFO_V1@@