शेंदुर्णीत भाजपाचा दणदणीत विजयनगराध्यपदी विजया खलसे ;17 पैकी 13 नगरसेवक भाजपाचे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Dec-2018
Total Views |
 
 
शेंदुर्णीत भाजपाचा दणदणीत विजय
नगराध्यपदी विजया खलसे ;
17 पैकी 13 नगरसेवक  भाजपाचे 
 
जळगाव, 11 डिसेंंबर
प्रतिष्ठेच्या शेंदुर्णी नगरपंचायतीच्या निवडणुकिची मतमोजणी 11 रोजी सकाळी 10.30 वा.सुरु झाली. 12 वाजेपर्यंत मतमोजणी पुर्ण होवून 2 हजार 900 मतांनी भाजपाच्या विजया खलसे या शेंदुर्णीच्या प्रथम नगराध्यक्षपदी विजयी झाल्या. नगरसेवकपदाच्या 17 जागांपैकी 13 जागी भाजपाने तर 4 जागी राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळविला आहे. शिवसेना व मनसेला खातेसुध्दा उघडता आले नाही.
निवडणुकित 17 हजार 897 मतदार होते यापैकी 13 हजार 304 यांनी मतदानाच हक्क बजावला असून 74.33 टक्के मतदान झाले आहे.
प्रभाग निहाय झालेले मतदान
प्रभाग क्र.1 - 1 हजार 230 मतदारांपैकी 990 यांनी मतदानाचा हक्क बजावला, प्रभाग 2- 939 पैकी 673 , प्रभाग 3- 1 हजार 113 पैकी 874 , प्रभाग 4- 898 पैकी 592 , प्रभाग 5 - 1 हजार 130 पैकी 869 , प्रभाग 6- 993 पैकी 771 , प्रभाग 7 – 789 पैक 605 , प्रभाग 8 – 1 हजार 375 पैकी 994 , प्रभाग 9- 1 हजार 50 पैकी 823 , प्रभाग 10 – 850 पैकी 651 , प्रभाग 11 - 1 हजार 228 पैकी 883 , प्रभाग 12 – 1 हजार 30 पैकी 773 , प्रभाग 13 – 1 हजार 45 पैकी 724 , प्रभाग 14 – 1 हजार 577 पैकी 1078 , प्रभाग 15 - 865 पैकी 626 , प्रभाग 16 – 914 पैकी 706 आणि प्रभाग 17 – 872 पैकी 672 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. असे 17 हजार 897 मतदारांपैकी 13 हजार 304 मतदारांनी मतदान केले असून 74.33 टक्के मतदान झाले.
5 टेबलवर हि मतमोजणी प्रक्रिया झाली.
 
@@AUTHORINFO_V1@@