धुळे महानगर पालिका आणि शेंदुर्णींत भाजपाचा बोलबाला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Dec-2018
Total Views |
धुळे महानगर पालिका आणि शेंदुर्णींत भाजपाचा बोलबाला
 
जळगाव, 11 डिसेंबर
धुळे महानगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकित 31 जागांवर भाजपा आघाडीवर आहे तर शेंदुर्णी नगरपंचायतीत भाजपाची 9 जागांसह विजयी घौडदौड सुरु आहे.
 
धुळे महानगर पालिकेच्या 74 जागांची मतमोजणी सुरु असून 31 जागांवर भाजपा आघाडीवर आहे. बहुमतापासून केवळ 7 जागा भा.ज.पा. लांब आहे.काँग्रेस -राष्ट्रवादी आघाडी 28, शिवसेना 3, लोकसंग्राम 2 आणि अन्य 2 अशी स्थिती आहे.
ना.गिरिष महाजन यांच्या जामनेर मतदार संघातील शेंदुर्णी नगरपंचयातीची मतमोजणी सुरु असून नगराध्यपदी भा.ज.पा.चा उमेदवार 1 हजार मतांनी आघाडीवर आहे तर नगरसेवकपदाच्या 17 जागांपैकी 12 प्रभागांचे निकाल जाहिर झाले असून 9 जागी भा.ज.पा. तर 3 जागी राष्ट्रवादी काँग्रेस विजयी झाली आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@