सेन्सेक्स ७१३ अंशांनी गडगडला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Dec-2018
Total Views |
 

मुंबई : देशातल्या पाच महत्वाच्या राज्यांतील निवडणूकांचे मतदान कल पाहता, सोमवारी शेअर बाजारावर दबाव जाणवला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स सकाळी बाजार सुरू झाल्यावर पाचशे अंशांनी घसरला. त्यानंतर तो ६५० अंशांनी गडगडला. दिवसअखेर तो ७१३.५३ अंशांनी घसरुन ३४ हजार ९५९.७२ वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २०५ अंशांनी घसरत १० हजार ४८८.४५ वर बंद झाला.

 

पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या कलांचा परिणाम सोमवारी शेअर बाजारावर जाणवला. आंतरराष्ट्रीय शेअर बाजारात कच्च्या तेलातील दरांच्या घसरणीमुळे रुपयाही घसरला. आंतरराष्ट्रीय बाजारातून कच्च्या तेलाचे उत्पादन कपात करण्याच्या ओपेकच्या निर्णयानंतर तेलाचे दर प्रतिबॅरल एक टक्क्याने वाढले आहेत.

 

रिलायन्ससह सर्व ब्ल्यू चिप कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण दिसून आली. निफ्टीमधील आयटीसी, महिंद्र एण्ड महिंद्रा, सन फार्मा, एलएण्ड़टी, आयसीआयसीआय बॅंक, भारती एअरटेल, एचडीएफसी, हिंदूस्तान युनिलीवर, अदानी पोर्ट आदी शेअरमध्ये घसरण झाली. परकी चलनात वाढ झाल्याचा परिणाम रुपयावर झाला. डॉलरच्या तुलनेत रुपया ७१.४०च्या स्तरावर खुला झाला. परकीय चलन गुंतवणूकीमध्ये डॉलरची मागणी वाढल्याने रुपयावर ताण पडला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@