आपले ध्येय निश्चित करा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Dec-2018
Total Views |

डॉ.सागर देशपांडे यांचे करिअर वेध व्याख्यानमालेत प्रतिपादन


चोपडा : 
 
आपले ध्येय निश्चित ठेवा त्यानुसार पुढे जा , स्वतःचे मन ज्या गोष्टीत रमते तेच करा, जे आवडत ते जमेल तरच ते करा आणि त्याची समाजाला काय गरज आहे ते लक्षात घेऊन ध्येय ठरवा, मृत्यूंजयकर शिवाजी सावंत यांच्या लहानपणाची गोष्ट सांगितली.
 
आजच्या जगात फक्त इंग्रजांची शिक्षण पद्धती बदलण्याची गरज आहे. जानेवारी ते डिसेंबर शैक्षणिक वर्ष असावे असे सरकारला सांगायचे आहे ,
 
टिळक मंडालेच्या तुरुंगात असताना मुलाचे मॅट्रिकचे वर्ष असताना पत्र लिहिले तुला अभ्यास करायचा आहे पण जमलं नाही तर जे पण करशील ते असेकर कि सर्व जण तुझ्याकडे आले पाहिजे, असे प्रतिपादन जेष्ट पत्रकार सागर देशपांडे यांनी केले.
 
 
चोपडे शिक्षण मंडळाचे माजी सेक्रेटरी व प्रताप विद्या मंदिराचे मुख्याध्यापक स्व.यशवंत गोविंद हरताळकर व्याख्यानमालेच्या चौथ्या वर्षात करिअर वेध या कार्यक्रमात डॅा.देशपांडे बोलत होते.
 
यावेळी मंचावर डॅा. विकास हरताळकर, कोल्हापूरच्या स्वंयसिध्दा संस्थेच्या संचालिका कांचन परुळेकर, किरण्मयी नेटके, माजी मुख्याध्यापक सुधाकर केंगे, उद्योजिका गार्गी भंडारी उपस्थित होत्या.
 
 
स्वागत डॅा.विकास हरताळकर यांनी केले. वक्त्यांचा परिचय प्रसाद वैद्य, डॅा.निता हरताळकर यांनी करुन दिला. डॉ.देशपांडे यांनी युवकांना करिअर संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले.
 
 
सुत्रसंचलन पवन लाठी यांनी केले. यावेळी विवेकानंद प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष घनश्याम अग्रवाल, सचिव अ‍ॅड.रवींद्र जैन, डॅा.महेंद्र जायसवाल, यांच्यासह विविध शाळांचे विद्यार्थी, शिक्षक,डॅाक्टर, नागरिक हजर होते.
मुलांना उद्योग करण्यास उद्युक्त करा : परूळेकर
 
आपल्या पैशांची योग्य किंमत मुलांना समजावी यासाठी आई वडील यांनी मुलांना सुटीच्या कालावधीत काहीतरी काम करायला उद्युक्त केले पाहिजे, त्यांच्यात मी करू शकतो,
 
आत्मविश्वास, नियोजन, टीम यासोबत छोट्या छोट्या गोष्टीतून आपलं करिअर घडवता येते, काही नवीन शिकायचे असेल तर त्यातील निष्णात व्यक्तीच्या हाताखाली काम शिकले पाहिजे.
 
कामाची लाज न बाळगता शिकण्याचा आणि उद्योगाकडे वळण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे कोल्हापूरच्या स्वयंसिद्धा संस्थेच्या संचालिका कांचन परूळेकर यांनी उद्योजकता प्रेरणा कार्यशाळेत सागितले.
@@AUTHORINFO_V1@@